Nashik News: शालेय विद्यार्थ्यांना ई कचऱ्याचे धडे; पर्यावरण रक्षणासाठी नामांकित कंपनीचा अनोखा उपक्रम

Nashik News: शालेय विद्यार्थ्यांना ई कचऱ्याचे धडे; पर्यावरण रक्षणासाठी नामांकित कंपनीचा अनोखा उपक्रम
Updated on

पंचवटी : शहरात ई कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात वाढ होत असून ही समस्यां दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. याची योग्य विल्हेवाट कशी लागली, नियोजन व्यवस्थापन कसे करावे. या संदर्भात नामांकित कंपनीने पुढाकार घेतला असून शहरातील महाविद्यालय कार्यशाळेच्या माध्यमातून धडे दिले जात आहेत. (E waste lessons for school students unique initiative by renowned company for environmental protection Nashik News)

सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर दिवसागणिक वाढला आहे. कोरोनाकाळात यात चांगलीच भर पडली. ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘ऑनलाइन स्कूल मुळे अगदी बालवाडीपासून ते महाविद्यालयापर्यंत आणि साध्या कंपनीपासून ते मल्टिनॅशनल कंपनीपर्यंत सर्वांनाच मोबाईल, टॅब आणि लॅपटॉपचा वापर करावा लागला होता.

परिणामी, संगणक, लॅपटॉप, मोबाईल, टॅब, हेडफोन, चार्जर आदी वस्तूंच्या खरेदीत मोठी उलाढाल देखील झाली होती. थोडासाही अडथळा आला तरी तत्काळ नवीन वस्तू घेण्याला प्राधान्य दिले गेले होते. त्यामुळे खराब झालेल्या वा बंद अवस्थेत असलेल्या या इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजेच ई -कचरा.

आज प्रत्येक घरातील अडगळीची जागा ई-कचऱ्याने व्यापली आहे. घरात, कार्यालयात खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अडगळीत पडून राहतात किंवा भंगार गोळा करणाऱ्यास दिल्या जातात. परंतु हा भंगार गोळा करणारा त्यांची योग्य विल्हेवाट लावतो की नाही, हे तपासले जात नाही.

ई- कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत रिसायकलिंग होणे गरजेचे असून यामुळे मोठा धोका टळू शकते. ही बाब सर्व सामान्यांपर्यंत पोहचावी. यासाठी नाशिक मधील एका नामांकित कंपनीने जनजागृती पर मोहीम सुरू केली आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Nashik News: शालेय विद्यार्थ्यांना ई कचऱ्याचे धडे; पर्यावरण रक्षणासाठी नामांकित कंपनीचा अनोखा उपक्रम
Achyut Godbole | मराठी ज्ञानभाषा होण्यासाठीच लेखन : अच्युत गोडबोले

याचे लाभले योगदान

नाशिक शहरातील अग्रणी असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा विद्याप्रसारक समाज, नाशिक एज्युकेशन सोसायटी, भोसला मिलिटरी हायस्कूल, गुरू गोविंदसिंह फाउंडेशन या संस्थांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि ई-कचरा व्यवस्थापन जनजागृती आणि संकलन कार्यक्रम ही कार्यशाळा घेण्यात मोलाचे योगदान दिले.

ढकांबेस्थित कंपनीची मोहीम

भविष्यात आपल्याला ई-कचरा कुठे टाकायचा कुठे, योग्य रित्या विल्हेवाट कशी लावावी. ही महत्त्वपूर्ण बाब आहे. कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जड धातू आणि अन्य विषारी रसायनांचा वापर केला जातो. यासाठी ई-कचऱ्याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे, ही बाब अधोरेखित करीत नाशिक शहरालगत ढकांबेस्थित कंपनी ही मोहीम राबवीत आहेत.

ई"-कचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया पूर्णतः नवीन असली तरीही आपण त्या प्रक्रियेचा भाग बनणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपल्या बद्दल जागरूक असायला हवे. ई-कचरा निर्मिती कमी करणे आणि शक्य तितका पुनर्वापर करण्याबद्दल जागरूकता वाढवणे ही पर्यावरण संवर्धन करणाऱ्या यशस्वी ई-कचरा व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे.

- परिक्षीत देशमुख, ई- कचरा रिसायकल तज्ज्ञ

Nashik News: शालेय विद्यार्थ्यांना ई कचऱ्याचे धडे; पर्यावरण रक्षणासाठी नामांकित कंपनीचा अनोखा उपक्रम
Nashik News : नवीन वर्षात मिळणार Incovacc लस; नाकावाटे लशीला शासनाची मंजुरी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.