नाशिक : अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील निवडक गुणवंत आणि होतकरू मागासवर्गीय (Backward Class) विद्यार्थ्यांसाठी २०२२-२३ या वर्षापासून ‘कमवा आणि शिका’ (Earn & Learn) ही ज्ञान कौशल्यावर आधारित नावीन्यपूर्ण शैक्षणिक योजना (Educational Scheme) राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली. (Earn and learn scheme for students opportunity to apply till July 5 Nashik News)
जिल्हा परिषदेच्या (ZP) समाजकल्याण विभागामध्ये तीन वर्षांसाठी प्रशासकीय काम करण्याची आणि पदवीनंतरच्या नोकरीसाठी आवश्यक विविध ज्ञान-कौशल्ये आत्मसात करून देण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्या बीबीए या अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सेस फंडातून २० टक्के मागासवर्गीय निधींतर्गत विद्यावेतन देण्याचीही नावीन्यपूर्ण योजना राबविली जाणार आहे.
या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी आठ हजार रुपये, दुसऱ्या वर्षी नऊ हजार रुपये आणि शेवटच्या वर्षासाठी दहा हजार रुपये विद्यावेतन प्रत्येक महिन्यासाठी अदा केले जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवास आणि भोजनासाठी खर्च भागविण्यासाठी मदत म्हणून दरमहा चार हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येईल. सलग तीन वर्षे समाधानकारकरीत्या काम आणि स्वयंअध्ययन यातून तिसऱ्या वर्षाच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची पदवी आणि तीन वर्षे काम केल्याचे कार्यालयाकडून प्रमाणपत्र असा विद्यार्थ्यांचा दुहेरी फायदा होणार आहे.
योजनेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वारस्य अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ जुलै २०२२ अशी असून, त्यासाठी https://tinyurl.com/zpnashikibba२०२२ ही ऑनलाइन लिंक समाजकल्याण विभागातर्फे उपलबध करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील १८ ते २२ वर्षे वयोगटातील नुकत्याच बारावी पास झालेल्या गुणवंत व होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती बनसोड यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.