SAKAL Exclusive : सिन्नरमध्ये अवतरणार ‘समृद्धी’

Interchange constructed on Samriddhi Highway at gonde
Interchange constructed on Samriddhi Highway at gondeesakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : शिंदे-फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूरपासून शिर्डीपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे अंतिम टप्प्यात आहेत. काही महिन्यात मुंबई-नागपूर दरम्यानची थेट वाहतूक सुरू होणार आहे. याच समृद्धी महामार्गावर सर्वांत मोठा आणि प्रशस्त असलेला इंटरचेंज सिन्नर तालुक्यातील गोंदे येथे साकारण्यात आला आहे.

सुमारे ७५ हेक्टर क्षेत्रावर असलेल्या या इंटरचेंजमुळे मुंबई, नागपूरसह गुजरात पुण्याकडे जाण्यासाठी दळणवळण सोपे होणार आहे. मुंबई-पुणे-नाशिक गोल्डन ट्रँगल कॉरिडॉर अंतर्गत सिन्नरचे औद्योगिक महत्त्व वाढले असून समृद्धी प्रकल्पामुळे त्यात अधिकच भर पडेल. (Easy connectivity to Gujarat Pune along with Nagpur Mumbai due to interchange at Gonde on samruddhi highway nashik news)

नाशिक -पुणे महामार्गाला समृद्धीशी जोडणारा गोंदे येथील इंटरचेंज पूर्णत्वास आला आहे. याठिकाणी आठ रॅम्प तयार करण्यात आले आहेत. नाशिक- पुणे महामार्गाच्या अंडरपासवर ९ ते १२ मीटर उंचीवर साकारलेल्या या इंटरचेंजवर चार ठिकाणी टोल पॉइंट असून एका टोलला दोन लेन करण्यात आल्या आहेत. या इंटरचेंजवरून नागपूर, मुंबई येथून येणाऱ्या वाहनधारकांना पुणे, नाशिककडे तसेच, शेजारच्या गुजरातला जाण्यासाठी येथे एक्झिट घेता येईल.

पर्यटन विकासास हातभार

नाशिक, पुण्याहून मुंबई, नागपूरकडे जाण्यासाठी या इंटरचेंजचा उपयोग होणार आहे. नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर अशा चारही ठिकाणची वाहने या इंटरचेंजचा वापर करणार असल्याने गोंदेचे पर्यायाने सिन्नरचे महत्त्व वाढणार आहे. औद्योगिक आणि व्यापारीदृष्ट्य़ा हा इंटरचेंज सिन्नरसाठी अधिक लाभदायी ठरणार आहे. समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या इंटरचेंजवरून स्थानिक उत्पादित होणारी फळे, भाजीपाला अल्पावधीत नागपूर आणि मुंबईला पोचवणे शक्य होणार आहे. शिवाय नाशिकच्या पर्यटन विकासास हातभार लागणार आहे.

समृद्धी महामार्ग गेमचेंजर

नाशिक जिल्ह्यात सिन्नरच्या गोंदेसह इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर याठिकाणी एन्ट्री व एक्झिट घेता येणार आहे. सिन्नरचे वाढते औद्योगिक महत्त्व लक्षात घेता गोंदे येथील इंटरचेंज सिन्नरच्या विकासासाठी नक्कीच गेमचेंजर ठरणार आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नागपुरातील औद्योगिक केंद्रे सिन्नर, नाशिकशी जलद रस्तेमार्गाने जोडली जाणार असल्यामुळे परिसरात जमिनींना महत्त्व येईल. दोडी ते गुरेवाडी दरम्यान जमिनीची किमती कोट्यवधींचे उड्डाण घेऊ पाहत आहेत.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Interchange constructed on Samriddhi Highway at gonde
Nashik News : टाकळी, तपोवन मलनिस्सारण केंद्राचे आधुनिकीकरण

समृद्धीलगत संरक्षक कुंपण

समृद्धी इंटरचेंजचा आजचा फायदा बघता नाशिक-पुणे महामार्गावरील गुरेवाडी फाटा ते दोडी दरम्यान हॉटेल, पेट्रोल-डिझेल पंप व्यवसायाला मोठी संधी मिळू शकते. मुंबई-नागपूरकडे जाणाऱ्या समृद्धीलगत संरक्षक कुंपण असल्याने येथे स्थानिक व्यावसायिकांना अथवा गुंतवणूकदारांना सध्या तरी संधी नाही. भविष्यात या ठिकाणी नवनगराची संकल्पना प्रत्यक्षात आल्यास जमिनींना चांगला भाव येईल.

मऱ्हळ शिवारात वे- साइड ॲम्युनिटीज...

सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ शिवारात दोन्ही बाजूला प्रत्येकी १० हेक्टर जागा संपादित करण्यात आली आहे. याठिकाणी वे-साइड

ॲम्युनिटीज उभारल्या जातील. त्यात एका बाजूला एचपीसीएल आणि दुसऱ्या बाजूला बीपीसीएल कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्याचे काम सुरू आहे. पंक्चर स्टेशन, पार्किंग, हॉटेल, शॉपिंग मॉल, चार्जिंग स्टेशन अशा सुविधा या वे- साइटमध्ये उपलब्ध असणार आहेत. गोंदे इंटरचेंज परिसरात तीन हजार स्क्वेअर फूट जागा पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक रॅम्पच्यामध्ये सुमारे दीड एकर म्हणजेच आठ रॅम्पच्या मध्ये एकूण सहा एकर मोकळी जागा राहणार आहे.

"समृद्धी महामार्ग दोन्ही बाजूंनी बंदिस्त व अधिक उंचीवर असल्यामुळे गोंदे परिसरात स्थानिकांना या महामार्गाचा आज तरी फायदा होणार नाही. केवळ नाशिक-पुणे महामार्गावर हॉटेल वा तत्सम व्यवसायाला संधी असेल. इंटरचेंजच्या परिसरात शासनाने औद्योगिक वसाहतीचा पर्याय आणल्यास स्थानिक विकासास मोठी संधी असेल."

- विनायक तांबे, माजी सभापती, सिन्नर बाजार समिती

Interchange constructed on Samriddhi Highway at gonde
Dhule Crime News : धुळ्यात पोलिसाच्याच घरी चोरी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.