पाणीपुरी खाणं पडलं महागात; 80 जणांना विषबाधा; जळगावच्या चोपडामधील घटना

Eating panipuri in market : जिल्ह्यातील चोपडामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. कमळगावच्या आठवडी बाजारात पाणीपुरी खाल्ल्यामुळे ८० जणांना विषबाधा झाली आहे.
panipuri
panipuri
Updated on

जळगाव- जिल्ह्यातील चोपडामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. कमळगावच्या आठवडी बाजारात पाणीपुरी खाल्ल्यामुळे ८० जणांना विषबाधा झाली आहे. काही रुग्णांना चोपडा रुग्णालयात तर काहींना जिल्ह्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. कमळगाव येथील आठवडी बाजारासाठी चाचवणी, मितावली, पिंपरीसह आजूबाजूच्या भागातील गावकरी आले होते. अनेकांनी ही पाणीपुरी खाल्ली होती, तसेच अनेकांनी पाणीपुरी घरी पार्सल नेलं होतं.

panipuri
Women’s Health: शारिरीक तंदूरूस्तीसाठी महिलांनी तिशीनंतर 'या' सुपरफूड्सचा आहारात करावा समावेश

पाणीपुरी खाल्ल्यानंतर अनेकांची तब्येत बिघडली. मंगळवारी सकाळी अनेकांना उलट्या, जुलाब, पोटदु:खी जाणवू लागली. त्यानंतर त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बाहेरचं खाताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

panipuri
Health Nurse Recruitment : लग्नाचा दाखला, गॅझेटच हवे;आरोग्यसेविका भरती परीक्षेला अनेक उमेदवार मुकले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.