E- Challan : सिग्नलवरील इ-चलन ‘रेगांळले’! स्मार्टसिटीकडून CCTVची क्षमेतेने पूर्तता नाहीच

echallan
echallanesakal
Updated on

E- Chalan : गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यापासून शहर आयुक्तालय हद्दीमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची प्रक्रिया या ना त्या कारणाने रेंगाळले आहे. स्मार्टसिटी प्रकल्पाच्या माध्यमातून वाहतूक सिग्नलवर सीसीटीव्ही बसविण्याचे कामही सुरू झाले.

परंतु ते पूर्ण क्षमेतेने बसविण्यात आलेले नाहीत. त्याचप्रमाणे या सीसीटीव्हीमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने अखेरीस निर्धारित वेळेत सिग्नलवरील सीसीटीव्हीवरून इ- चलनाद्वारे होणाऱ्या कारवाईच्या प्रक्रियेला पुन्हा ब्रेक लागला आहे. (echallan on Signal process slowed SmartCity does not cater to CCTV nashik news)

शहरासाठी स्मार्टसिटी प्रकल्पाच्या माध्यमातून सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. यासाठी गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यापासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु दुसरा सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आला असतानाही सदर प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही.

स्मार्टसिटीच्या माध्यमातून शहरात सुमारे एक हजार सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात ६०० सीसीटीव्ही बसविण्याच्या कामास काही महिन्यांपूर्वी प्रारंभही झाला. यातील वाहतूक सिग्नलवरील ४५ सीसीटीव्ही जूनच्या मध्यापासून सुरूही होणार होते.

परंतु या निर्धारित वेळेतही ४५ सिग्नलवर सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. यामुळे सीसीटीव्हीच सुरू नसल्याने इ-चलनाद्वारे बेशिस्त वाहनचालकांविरोधातील कारवाईचाही मुहूर्त हुकला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

echallan
Nashik : हॅलो, मला शबरी घरकुल योजनेची माहिती हवी आहे; आदिवासी विकासमंत्रीच असा कॉल करतात तेव्हा...

शहरातील वाहतूक सिग्नलवरील सीसीटीव्ही सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात कमांड कंट्रोल रूम उभारण्यात आली आहे. या ठिकाणी एलसीटी वॉल उभारण्यात आली असून, शहरातील प्रत्येक सिग्नलवरील सीसीटीव्ही या एलसीडी वॉलशी जोडला जाणार आहे.

यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ऑनलाइन इ-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करणे पोलिसांना सोपे जाणार होते. परंतु पूर्ण क्षमेतेने सीसीटीव्ही न बसविल्याने ते कार्यान्वित करता आलेले नाही. परिणामी वाहतूक पोलिस शाखेच्या कारवाईलाच ब्रेक लागला आहे.

"सिग्नल्सवरील सीसीटीव्ही सुरू करण्यामागे अजूनही काही तांत्रिक अडचणी आहेत. स्मार्ट सिटीकडे यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच सिग्नल्सवरील सीसीटीव्ही सुरू होतील." - मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.

echallan
Nashik News: समितीचा दौरा होता पेठला अन विमान उतरले इंदूरला! जलशक्ती समिती अध्यक्षांचे विमान भरकटले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.