Nashik News: शिक्षण विभाग सांगणार तृणधान्याचे महत्त्व! 1 ऑगस्टपासून शाळांमध्ये जनजागृतीसाठी विविध उपक्रम

Millets
MilletsSakal
Updated on

Nashik News : केंद्र सरकारने २०२३ हे वर्ष जागतिक भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. याच अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने मिलेट महोत्सव भरविला जाईल.

यापुढे जात जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने पौष्टिक तृणधान्याविषयी जागृती करण्याची जबाबदारी शिक्षण विभागावर टाकली आहे. त्यासाठी १ ऑगस्टपासून विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. (Education department will tell importance of cereal Various activities for awareness in schools from August 1 Nashik News)

शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, अधीक्षक यांना पत्र काढले आहे. पौष्टिक तृणधान्य जागृतीसाठी तालुका तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना विविध उपक्रम राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

१ ऑगस्ट ते १४ ऑगस्टदरम्यान जिल्हाभरातील शाळांमध्ये तृणधान्यांबद्दल कृषी सहायकांमार्फत माहिती देण्यात येईल. त्यात शाळांमध्ये पालक, नागरिक यांचाही समावेश असणार आहे.

तसेच १ ते १५ सप्टेंबरदरम्यान पोषण पंधरवडा साजरा केला जाईल. पंधरवड्यात पालक, नागरिक तसेच स्वयंपाकी, मदतनीस यांच्या मदतीने पाककृती स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धांमधून एक पाककृती तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पाठवली जाईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Millets
Manipur Violence: मणिपूर घटनेच्या निषेधार्थ भव्य मूकमोर्चा; 20हून अधिक संघटनांचा सहभाग

तालुकास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या पाककृतींना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे पाच हजार, साडेतीन हजार व अडीच हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे.

जिल्ह्यात १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान निबंध व वक्तृत्व स्पर्धा होतील. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे.

या उपक्रमांसाठी लागणारा निधी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण या योजनेतून मिळेल. यामुळे भरड धान्याविषयी जागृती करण्यासाठी शिक्षण विभागही सरसावला आहे.

Millets
Nashik News : ‘आयुक्त’पदी असताना लोकोपयोगी कामे मार्गी : भाग्यश्री बानायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.