Nashik News : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाभरातील प्राथमिक शिक्षकांच्या निवडश्रेणी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विस्ताराधिकारी व पदवीधर प्रमोशन व इतर प्रलंबित प्रश्नांच्या बाबतीत आज जिल्हा शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्नांच्या बाबतीत चर्चा केली. (Education Officer insurance Second installment of seventh pay to teachers in October pay nashik news)
प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची विनंती केली असता, शिक्षणाधिकारी बच्छाव यांनी या वर्षी शिक्षकांची दिवाळी आनंददायी करण्याचे अभिवचन शिक्षक संघाला दिले. आज झालेल्या बैठकीनुसार ६ नोव्हेंबरपूर्वी बारा वर्षांपासून प्रलंबित असलेली निवडश्रेणीचे काम पूर्ण केले जाईल.
महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाने प्रभारी केंद्रप्रमुखांचं काम छोडो आंदोलन केल्याने हा एक प्रश्न मार्गी लावणार असून, ३० नोव्हेंबरपूर्वी मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख प्रमोशन पूर्ण करण्याचे मान्य केले. तसेच पदवीधर वेतनश्रेणी नाकारणाऱ्या शिक्षकांचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत, असे सांगितले.
ऑक्टोबर महिन्याच्या वेतनात सर्व शिक्षकांचा सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता रक्कम व काही लोकांचा पहिला हप्ता रक्कम जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. वेतन आयोग फरकासाठी लागणार ना देय दाखला गटस्तरावरून परस्पर दिला जाणार आहे.
तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणीचे काम आरोग्य केंद्रामार्फत करण्याच्या बाबतीत शिक्षण विभागाचे पत्र निर्गमित केले आहे. पुढील आठवड्यात पुन्हा एकदा राहिलेल्या प्रश्नावर सर्व संघटनांसमवेत सभा आयोजित करण्याचे मान्य केले.
या वेळी शिक्षक संघाच्या वतीने जिल्हानेते अर्जुन ताकाटे, विभागीय अध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, जिल्हाध्यक्ष बाजीराव सोनवणे, सरचिटणीस निवृत्ती नाठे, कार्यकारी अध्यक्ष धनंजय आहेर, सल्लागार धनराज वाणी, कोषाध्यक्ष किरण सोनवणे, एनपीएसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पेखळे, निंबा बोरसे, सुजित गायधनी व इतर कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.