Nashik News : लालफितीला सेवा अभियानाचा पर्याय; शैक्षणिक समस्या मार्गी लावण्यासाठी शिक्षणसेवा पंधरवडा राबविणार

Education
EducationSakal
Updated on

Nashik News : शिक्षण क्षेत्र असे आहे, की जिथे समस्यांचा महापूर आहे. शिक्षकच नव्हे तर विद्यार्थी, पालक, अधिकारी यांचे अनेक प्रश्न तालुका ते राज्यस्तरावर प्रलंबित आहेत. या प्रश्नांची कालमर्यादेत सोडवणूक व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने शिक्षणसेवा पंधरवडा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी शिक्षकदिनापासून हा पंधरवडा राबविला जाणार असून, शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याचा हेतू यामागे आहे. (Educational services will conduct fortnite on Teachers Day to solve educational problems nashik news)

शैक्षणिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षकांना वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यामुळे हे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासह प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गतिमान व पारदर्शक पद्धतीने विहित कालमर्यादेत सेवा देण्याच्या अनुषंगाने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हा उपक्रम राबविला जाणार आहे.

प्रत्येक वर्षी आता शिक्षकदिनानंतर दुसऱ्या दिवसापासून हा शिक्षणसेवा पंधरवडा राबवून विद्यार्थी पालकाभिमुख व प्रशासकीय घटकांशी संबंधित कामाच्या निपटऱ्यासाठी कालबद्ध मोहीम या अंतर्गत आखली जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Education
Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन; नांदगाव तालुका अद्यापही तहानलेलाच

या अभियानांतर्गत शैक्षणिक अर्ज, निवेदने व प्रलंबित असलेल्या तक्रारी नियमानुसार निकाली काढाव्यात, प्रलंबित असलेल्या सुनावणी प्रकरने सुनावणी घेऊन त्याच दिवशी निकाली काढावीत, न्यायालयीन प्रकरणांना गती द्यावी, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीच्या संदर्भात तक्रारी वाढत असल्याने ही प्रकरणे वेगाने मार्गी लावावीत, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करावे, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रलंबित चौकशा पूर्ण कराव्यात, तसेच सेव पुस्तके, बिंदू नामावली, अभिलेख कक्ष अद्ययावत करणे, नोंदवहीचे अद्ययावतीकरण करणे, विविध योजना राबविणे या अभियानामध्ये अभिप्रेत आहेत. शिक्षण विभागाने चांगली संकल्पना मांडली असून, प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्यास नक्कीच शैक्षणिकदृष्ट्या याचा हेतू सफल होईल.

"शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या प्रलंबित आहेत. शासन स्तरावरून सातत्याने आम्ही पाठपुरावा करून या प्रश्नांची सोडवणूक करत असतो. किंबहुना नाशिक विभागात तर जिल्हानिहाय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिक्षक दरबार घेऊन अनेक प्रश्न सोडविले. मंत्री महोदयांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारे शिक्षणसेवा अभियान देखील शैक्षणिक कामकाजाला समस्या सोडविण्यासाठी गती देणारे ठरेल, हे नक्की!" -किशोर दराडे, शिक्षक आमदार, नाशिक विभाग

Education
Nashik News : भोजापूर धरणात 98 टक्के पाणीसाठा; पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.