नाशिक : नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यात तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारीही वाढली आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी यांनी केले. (Educationist Joshi statement responsibility of teachers increased in new education policy nashik news)
जिल्हा परिषद व लीडरशिप फॉर इक्विटी (एलएफई) संस्थेतर्फे जिल्ह्याच्या शैक्षणिक धोरणाबद्दल ‘ई-२०’ शिक्षण परिषद नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे झाली. त्या वेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, ‘एलएफई’ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दामिनी माइनकर, संचालक साईप्रसाद साळे, बिलिफ संस्थेचे अतुल गायकवाड आदी उपस्थित होते.
श्रीमती मित्तल यांनी जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमांबद्दल माहिती देत भविष्यवेधी शिक्षणाच्या दृष्टीने काम करण्यासाठी शिक्षण उत्सव उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणची अंमलबजावणी कशी करावी, याबाबत सचिन जोशी यांनी मार्गदर्शन केले.
नवीन शैक्षणिक धोरणामधून निपुण भारत अभियान असल्याचे सांगत नवीन केंद्रप्रमुखांनी निपुण भारत अभियानात समाविष्ट कार्यपद्धतीचा अवलंब करणाऱ्या शाळांना ‘निपुण भारत शाळा’ म्हणून घोषणा करावी. मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान या गोष्टींवर अध्यापन प्रक्रियेत भर द्यावा, असे बिलिफ संस्थेचे अतुल गायकवाड यांनी सांगितले.
शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षक, अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या संकल्पनांचे प्रदर्शन या वेळी भरविण्यात आले होते. त्याचे उद्घाटनही आशिमा मित्तल यांच्या हस्ते झाले. मित्तल यांनी प्रदर्शनात मांडलेल्या संकल्पना जाणून घेतल्या. शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षक, अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा गौरव झाला. नेहा शिरोरे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती माइनकर यांनी आभार मानले.
.......चौकट
यांचा झाला गौरव ः
अंगणवाडी पर्यवेक्षिका ः श्वेता गडाख, सुखदा पराशरे,
शिक्षक ः दत्तात्रय शिंपी, कुंदा बच्छाव, भारती पवार, प्रतिभा पाटील, आशा बढे, माधव इंगळे, ज्योती अहिरे, नौशाद अब्बास मुसलमान, प्रकाश चव्हाण, वंदना भामरे, राजू घोटेकर, प्रवीण पाटील, सोनाली पाटील, संदीप गीते, चित्रा देवरे
शिक्षण विस्तार अधिकारी ः भाऊसाहेब सरक, प्रमिला शेंडगे
शिक्षणाधिकारी ः प्रमोद चिंचले.
------------
Remarks :
नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकांची जबाबदारी वाढली
Audit History:
--=============================
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.