नाशिक : पावणेचार हजार हरकतींचा पाऊस पडल्यानंतर प्रशासनावरच संशयाची सुई स्थिरावत असल्याने अखेरीस आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांनी स्वतः मैदानात उतरतं कामाची झाडाझडती घेण्यास सुरवात केली आहे. मतदार यादी (Voter List) हातात घेऊन पंचवटी विभागात सर्वाधिक तक्रारी असलेल्या भागात प्रभागांच्या सीमेवरील भागाची पाहणी करतं आयुक्तांनी महापालिका निवडणुका (NMC Election) निपक्षपाती होण्याचा विश्वास मतदारांना दिला. (Efforts of NMC Commissioner for fair voting in honor of voters Nashik News)
महापालिकेच्या निवडणुका निपक्षपाती होण्यासाठी पालिका आयुक्त रमेश पवार यांच्याकडून बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष दिले जात आहे. प्रभागरचना, आरक्षण प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर आता प्रारूप मतदार याद्यांवर काम सुरू आहे. २३ जूनला प्रारूप मतदार याद्या घोषित करण्यात आल्या. तीन जुलैपर्यंत तीन हजार ८४७ हरकती दाखल झाल्या. २ जुलैला ८११ हरकती, तर तीन जुलैला बाराशेहून अधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. हरकत एकच परंतु अनेक व्यक्तींनी संयुक्तिक हरकत न नोंदविता स्वतंत्र नोंद केल्याने हरकतींची संख्या वाढल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी आयुक्त पवार यांनी मतदारांच्या तसेच ज्या भागात सर्वाधिक हरकती आहेत.
अशा प्रभागांच्या सीमेवर जाऊन स्वतः तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. मतदार याद्यांवरील हरकतींची प्रभागनिहाय तपासणी करण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली. त्या पथकाकडून चुकीच्या पद्धतीने काम झाले का याची तपासणी करण्यासाठी आज आयुक्त पवार यांनी पंचवटी विभागात धडक मारली. चामर लेणी भागातील रामनाथनगर परिसरात कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची तपासणी केली. मतदार यादी तयार करणारे कर्मचारीवर कोणाचा दबाव आहे का, याची खातरजमा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.