शहापूर (नाशिक) : जगभरात कोरोनाच्या सावटामुळे शेतमालासह सर्वच क्षेत्रांत मंदीचे वातावरण आहे. मात्र, अशाही स्थितीत येथील दत्तात्रय सननसे यांनी भरताच्या वांग्याचे एकरी चार लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
कोरोना संकटातही शहापूरच्या शेतकऱ्याने साधली किमया
सननसे तीन वर्षांपासून भरताच्या वांग्याची लागवड करतात. या वर्षी त्यांनी एक एकर क्षेत्रावर पाच बाय पाच फूट अंतरावर भरताच्या वांग्याची दोन हजार रोपे लावली होती. त्यासाठी बामनोद येथील रमेश फेंगडे यांच्याकडून तीन वर्षांपूर्वी आणलेले घरगुती बियाणे वापरून रोपे तयार केली असून, त्यांची लागवड करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या काळात त्यांना तीन लाख पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, आणखी पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे चित्र आहे. दुसरीकडे या एक एकरावर आतापर्यंत केवळ नव्वद हजार रुपये खर्च झाल्याचेही त्यांनी सांगितले.
१३ जुलैला लागवड केल्याने नवरात्रीपासून माल सुरू झाला. दिवाळीपर्यंत प्रतिकिलो पस्तीस ते चाळीस रुपये भाव मिळाला. या एक महिन्यात चांगला भाव मिळाल्याने दोन लाख २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. वांग्याची क्वालिटी चांगली असल्याने, भुसावळ परिसरातून दर वर्षी मोठी मागणी असते. -दत्तात्रय सननसे, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.