नाशिक : नाशिकच्या राजकारणात शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये (Shiv sena & BJP) विळ्या-भोपळ्याचे सख्य राहिले आहे. त्यामुळे शिवसेनेचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यालयात तळ ठोकला आहे. तसेच आज सायंकाळी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते जमले होते. त्यांनी आवाज कुणाचा?...शिवसेनेचा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. (eknath shinde rebellion impacts on shiv sena bjp ofice in city Nashik political news)
विधानपरिषदेत भारतीय जनता पक्षाने यश मिळविल्याचा आनंदोत्सव वसंत-स्मृती कार्यालयासमोर साजरा झाला. त्यानिमित्ताने बंदोबस्तासाठी दाखल झालेले पोलिस इथे थांबून राहिले. या कार्यालयाकडे येणाऱ्या दोन्ही मार्गावर लोखंडी जाळ्यांचे अडथळे उभे करण्यात आले होते. तसेच बंदोबस्तासाठी पोलिसांना घेऊन आलेले वाहन कार्यालयाच्या समोरील भागात थांबले होते. सायंकाळच्या सुमारास कार्यालयीन व्यवस्थेत असलेले मोजके कार्यकर्ते कार्यालयात थांबून दूरचित्रवाहिन्यांवरील बातम्या पाहण्यात रमून गेले होते. अधूनमधून पोलिस सुद्धा बातम्या पाहण्यासाठी कार्यालयात डोकावत होते.
दरम्यान, युवा सेनेच्या कामकाजानिमित्त मुंबईहून आलेल्या शीतल देवरूखकर यांच्यासह युवा सेनेचे कार्यकर्ते शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर जमा झाले. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरनगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, ज्येष्ठ नेते सुनील बागूल, विलास शिंदे हेही यावेळी उपस्थित होते. ‘शिवसेना-झिंदाबाद', ‘ताकद कुणाची?...शिवसेनेची‘, ‘जय जय जय भवानी‘, ‘बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो‘, ‘उद्धव ठाकरे तुम आगे बढो‘, ‘आदित्य ठाकरे तुम आगे बढो‘, अशा घोषणा देण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.