Nashik AIMA Election : अंबड औद्योगिक मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या द्विवार्षीक निवडणुकीत बुधवारी (ता. ३१) मतमोजणीत सत्ताधारी एकता पॅनलने सत्ता अबाधित राखली.
असे असली तरी आमले यांनी मात्र १६४ मतांची एकाकी झुंज देत आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. बुधवारी आयमा रिक्रिएशन हॉल येथे सकाळी नऊपासून मतमोजणीला सुरवात झाली. (Ekta panel power intact in Aima election nashik news)
संस्थेच्या या वेळी ८९८ सभासदांनी आपला हक्क बजावला होता. निवडणूक निर्णय अधिकारी विवेक गोगटे तसेच सतीश कोठारी आणि एस. टी. गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरू झाली. चार टेबलावर २१ कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही प्रक्रिया पार पडली. ८९८ मतदानापैकी १५ मत बाद झाले. एकाकी झुंज देणारे एकमेव उमेदवार अनिल आमले यांना १६४ मत मिळाली.
सहा पदासाठी व पंचवीस इतर संचालक जागेसाठी ही निवडणूक झाली. सहा पदाधिकारी बिनविरोध निवड झाली, तर २५ संचालक पदांपैकी एका जागेवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सत्ताधारी गटाला अमोल आमले याची माघार घेता आली नसल्याने ही वेळ आली होती.
यात सत्ताधारी एकता पॅनलचे नेते धनंजय बेळे, वरून तलवार, आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ व माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे यांनी प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत एक हाती सत्ता अबाधित ठेवली. निकालानंतर आयमा कार्यालयासमोर एकच जल्लोष करण्यात आला. विरोधक आमले यांनीही पराभव मान्य करत निकालानंतर विजय उमेदवारांचे अभिनंदन करत खिलाडूवृत्ती दाखवली
मतमोजणीचा निकाल
अध्यक्ष - ललित बूब, उपाध्यक्ष - राजेंद्र पानसरे, जनरल सेक्रेटरी प्रमोद वाघ, खजिनदार - गोविंद झा, सहसेक्रेटरी - हर्षद बेळे, सहसेक्रेटरी - योगिता आहेर.
इतर संचालकांना झालेले मतदान
उमेदवारांचे नाव - मिळालेली मत
जितेंद्र आहेर - ८०१
जयदीप अलिमचंदानी- ७९५
अनिल आमले - १६४
बजाज सुमीत - ७९१
अविनाश बोडके - ७९९
स्वेता चांडक - ८००
कुंदन धारंगे - ७९७
विराज गडकरी - ७९२
राहुल गांगुर्डे - ७९२
हेमंत खोड - ७९७
उमेश कोठावदे - ८०४
विनोद कुंभार - ७९८
रवींद्र महादेवकर - ८०४
अविनाश मराठे - ८०२
जयंत पगार - ७९६
श्रीलाल पांडे - ७८०
जगदीश पाटील - ७९७
करणसिंग पाटील - ७९०
मनीष रावल - ८०५
रवी शामदासानी - ८०१
धिरज वडनेरे - ७९१
डी.विभूते - ७८९
दिलीप वाघ - ८०१
अजय यादव - ७६८
रवींद्र झोपे - ७७५
''अनेक वर्षांपासून आयमात तरुणांना संधी दिल्यामुळे अनेक नवनवीन प्रकल्पाबरोबर उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी प्रयत्न केल्यानेच एकता पॅनलवर कायम विश्वास राहिला आहे. त्यामुळे हा विजय झाला.''- धनंजय बेळे, एकता पॅनल नेते
''आयमा ही संस्था अतिशय उत्कृष्ट संस्था असून, या संस्थेत काम करण्याची इच्छा होती. त्या दृष्टीने मीही प्रयत्न केले, पण मला समावून घेतले नाही त्यामुळे निवडणूक झाली. सभासदांनी दिलेला निकाल मला मान्य आहे. सर्व विजय उमेदवारांचे अभिनंदन.''- अनिल आमले, पराभूत उमेदवार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.