Nashik: जिल्हा बँकेच्या हलगर्जीपणामुळे वृद्ध महिलेची उपासमार; पैसे मिळत नसल्याने शाखा कार्यालयाला ठोकणार टाळे

File Photo
File Photoesakal
Updated on

सिन्नर तालुक्यातील वावी येथील जिल्हा बँकेच्या शाखेत 10 वर्षांपूर्वी आपली जमिन विकून 2 लाख 41 हजारांची ठेव ठेवलेल्या वृध्द महिलेला वारंवार हेलपाटे मारून देखील पैसे मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

याबाबत पांगरी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना निवेदन देत महिलेला तात्काळ पैसे देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र बँक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे मंगळवारी (दि.12) वावी येथील शाखेला टाळे ठोकण्यात येणार आहे. (Elderly woman starves due to laxity of district bank money not received NDCC branch office will be closed at pangri Nashik)

पांगरी येथील वत्सलाबाई त्र्यबंक पगार (80) ही महिला नाशिक मध्यवर्ती सहकारी बँकेची वावी येथील शाखेत खातेदार आहेत. त्यांनी दहा वर्षापूर्वी आपली सर्व जमीन विकून आपल्या खात्यात 2 लाख 41 हजार रुपये ठेव ठेवलेली होती.

या महिलेचे वय झाल्याने त्यांना विविध आजार जडले आहेत. बँकेतील पैसे असताना देखील त्यांना स्वतःवर उपचार करता येत नाही. घरातही हालाखीची परिस्थिती असून पैसे नसल्यामुळे उपासमार होत आहे.

पांगरी येथील आशा त्र्यंबक पगार (35) या महिलेनेही दहा वर्षांपूर्वी आपली जमिन विकून 2 लाख 73 हजारांची ठेव केली होती. मात्र, आजारपणात व उपासमार होत असताना महिलेने बँकेकडे वारंवार आपले पैैसे मागूनही त्यांना पैसे न मिळाल्याने उपचाराअभावी महिलेचा मृत्यू झाला.

मागुन देखील त्यांना वेळेवर पैसे न दिल्यामुळे त्यांना स्वतः वर उपचार करता आले नाही. त्यामुळे तरुणपणात आजारपण व उपासमारीमुळे त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

File Photo
Nashik Crime: ट्रॉली चोरणे आले अंगलट; नवा कोरा ट्रॅक्टर फसल्यामुळे चोरट्यांना काढावा लागला पळ

त्यामुळे वत्सलाबाई यांना तात्काळ बँकेने पैसे मिळवून द्यावे तसेच आशा पगार यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी, गणेश ढवळे, दिनेश पांगरकर, विजय लांडगे यांनी वावी शाखेच्या व्यवस्थापकांना निवेदन देऊन केली आहे.

बँकेत पैसे मिळवताना वृद्धांना मिळणारी वागणूक व त्यांना सतत हेलपाटे मारावे लागत असल्याने मंगळवारी जिल्हा बँकेच्या वावी शाखेला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.

File Photo
Crime News: आईनेच केला पोटच्या मुलाचा खून; धक्कादायक कारण आलं समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.