नाशिक : शहरातील वडाळगाव भागातील रेणुका नगर हौसिंग सोसायटी येथील गृहनिर्माण संस्थेच्या क्रियाशील सभासदांनी संस्थेमधील ज्या सभासदांनी पैसे भरलेले आहेत. त्यांची यादी जाहीर करून त्यानंतर निवडणूक घेण्यात यावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे.
असे आदेश असतानाही नाशिक उपनिबंधक कार्यालय तथा संस्थेवर नियुक्त प्रशासक यांच्याकडून या संस्थेची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री भुसे यांनी देखील सूचना दिलेल्या असताना, निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. हा संस्था सभासदांवर मोठा अन्याय असल्याची भावना सभासद अजय तिवारी यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. (Election by ignoring the High Court verdict Nashik News)
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
रेणुका नगर हौसिंग सोसायटीचे एकूण ३४९ सभासद असून सदर सभासदांना निवडणुकीची माहिती होण्याकरिता व त्यापूर्वीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित शासकीय कार्यालयाने १०१ ची नोटीस त्याचप्रमाणे प्रारूप यादी निवडणुकीपूर्वी जाहीर करणे कायदेशीररीत्या आवश्यक होते. परंतु, सदर प्रक्रिया राजकीय दबावामुळे राबविण्यात आली नाही.
उपनिबंधक कार्यालयाकडून फक्त ४० लोकांची यादी जाहीर केली. या विरोधात ८ फेब्रुवारी २०२३ ला न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामध्ये न्यायालयाने सोसायटीच्या बाजूने निकाल देत, १५ मार्च २०२३ पर्यंत सर्व सभासदांची थकबाकी भरून अंतिम यादी तयार करण्याचे निर्देश दिले होते.
परंतु, संबंधित अधिकाऱ्यांनी थकबाकी दारांची नावे हे अंतिम यादीमध्ये प्रसिद्ध केली आहे. अन्यायाविरुद्ध दाद मागण्याकरिता अजय तिवारी, अजहर शेख, अंजुम शेख, विकास कडलग, फिरोज शेख संस्थेचे सभासद प्रयत्नशील आहे. ही निवडणूक प्रक्रिया रद्द केली नाही तर सभासद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन तसेच, उपोषण करतील असा इशारा श्री. तिवारी यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.