Gram Panchayat : जानेवारी ते डिसेंबर २०२३ यादरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नव्याने स्थापन झालेल्या जिल्ह्यातील सुमारे ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे.
मुदत संपणाऱ्या आणि चुकीची प्रभागरचना झाल्याने निवडणुका होऊ न शकलेल्या राज्यातील दोन हजार २९८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
तसेच ज्या ग्रामपंचायत सदस्यांचे निधन, राजीनामा आणि इतर कारणांमुळे थेट सरपंचाच्या जागा रिक्त झालेल्या दोन हजार ६८ ग्रामपंचायतीत दोन हजार ९५० सदस्यांच्या आणि १३० थेट सरपंचांच्या रिक्त पदांच्या निवडणुकीसाठी २५ ऑगस्टला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. (Election Commission has announced schedule of elections for about 44 Gram Panchayats in North Maharashtra news)
शुक्रवार (ता. ६)पासून निवडणुकीचा कार्यक्रम लागू होणार आहे. शुक्रवारी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. १६ ऑक्टोबरपासून अर्ज मागविले जाणार आहेत. २० ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
२५ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्याच दिवशी दुपारी तीनला माघारीनंतर उमेदवाराची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ५ नोव्हेंबरला सकाळी साडेसातपासून मतदान होणार आहे.
४४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका
उत्तर महाराष्ट्रात एकूण ४४२ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. सर्वाधीक १८७ ग्रामपंचायती नगर जिल्ह्यातील आहे. त्याखालोखाल जळगाव १६४, नाशिक ४४, धुळे ३१ आणि नंदुरबार १६ ग्रामपंचायतींत निवडणुकांचा धुरळा सुरू होणार आहे.
सरपंचपदासाठी वेगळ्या निवडणुका आहेत. सदस्यांचे राजीनामे, मृत्यू यामुळे रिक्त असलेल्या ग्रामपंचायतींत निवडणुका होणार असल्याने नाशिक ४८, जळगाव १६८, नगर १९४ अशा तीन जिल्ह्यांत अतिरिक्त १५ सरपंचांची निवड होणार आहे.
जिल्ह्यातील चित्र असे
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी (१६),बागलाण (८), त्र्यंबकेश्वर (६), नाशिक (५), कळवण (५), देवळा (३),येवला (२), मालेगाव (१), दिंडोरी (१), निफाड (१) याप्रमाणे ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायती अशा ः टाके घोटी, धारगाव, शिरसाठे, नागोसली, ओंडली, आडवण, लक्ष्मीनगर, कृष्णनगर, दोडत, उंबरकोन, सोमज, मोगरे, मोडाळे, कुशेगाव, बोरटेंभे, नांदगाव सदो (इगतपुरी), चिराई, भवाडे, केळझर, भाक्षी, मुळाणे, केरसाणे, जामोटी, तताणी (बागलाण), महादेवनगर, सोमनाथनगर, मेटघर किल्ला, साप्ते, सापगाव, हरसूल (त्र्यंबकेश्वर), जलालपूर, महादेवपूर, गंगाम्हाळुंगी, पिंपळगाव, सुभाषनगर (नाशिक), सलरेदिगर, कोसवन, खडकी, देसगाव, करंभेळ (कळवण), मेशी, माळवाडी, फुलेमाळवाडी (देवळा), शिरसगाव लौकी, लौकीशिरस (येवला), मांजरे (मालेगाव), गवळवाडी (दिंडोरी), पालखेड (निफाड).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.