Nashik Political News : निवडणूक ग्रामपंचायतची पण चर्चा विधानसभेची!

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election esakal
Updated on

निफाड (जि. नाशिक) : नाशिक जिल्हामध्ये निफाड तालुका राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील प्रतिष्ठेची असलेली पिंपळगाव बसवंतची निवडणूक खऱ्या अर्थाने अतिशय चुरशीची आणि अटीतटीची ठरली. यासह इतर १९ ग्रामपंचायतीचे निकाल धक्कादायक ठरले. मात्र ही निवडणूक ग्रामपंचायतीची असली तरी खऱ्या अर्थाने चर्चा ही विधानसभेची रंगली. (Election Gram Panchayat but discussion of Assembly Nashik Political News)

तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जोरदार रणधुमाळी रंगली आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ग्रामपंचायत निवडणूक लिटमस टेस्ट ठरली. पिंपळगाव बसवंत तसेच तालुक्यामधील गोदाकाठ भागातील चांदोरी, शिंगवे, तारुखेडले तर कसबे सुकेणे, साकोरे, कोकणगाव, नांदुर्डी येथील एक गठ्ठा मतदान तालुक्यातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. येथील मतदार कोणाला विजयी करायचे आणि कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे आधीच ठरवत असतो.

निफाड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या लढती आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबरोबरच विधानसभेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. खास करून यंदाच्या निवडणुकीमध्ये पॅनल करताना आगामी निवडणुकीमध्ये मदत करण्याचा शब्द सोडून घेतल्याने त्याची झलक या निवडणुकीमध्ये दिसली. या निवडणुकीत भाजप, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासह स्थानिक आघाडी यांनी आपला सहभाग नोंदवत निवडणूक अतिशय चुरशीची केली.

Gram Panchayat Election
Mediation center : ‘मध्यस्‍थी’ने दावा निकाली अन् विम्‍यापोटी मिळाले सव्वाकोटी!

यात खऱ्या अर्थाने लढत झाली ती महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटामध्येच. त्यात पिंपळगाव बसवंतमध्ये घरच्या मैदानावर आमदार बनकर यांना दणका बसला आहे. तर मोठ्या मतदार संघाच्या गावामध्ये मतदारांनी शिवसेनेच्या बाजूने कल दिल्याने खऱ्या अर्थाने माजी आमदार अनिल कदम यांच्यासाठी ही निवडणूक बूस्टर डोस देणारी ठरली आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने पिंपळगाव मधून सतीश मोरे, चांदोरीचे संदीप टर्ले, शिंगवेतून गोकुळ गीते, पिंपळसचे तानाजी पुरकर, खडक माळेगाव येथील विकास रायते, कोकणगावचे भारत मोरे तसेच साकोरे येथील अनिल बोरस्ते हे चेहरे निवडणुकीमध्ये बहुचर्चित ठरले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये त्यांची दस्तक राहणार आहे. एकूणच निफाड तालुक्यातील झालेली ग्रामपंचायतीची निवडणूक ही आगामी निवडणुकांची नांदी ठरणार हे निश्चित.

Gram Panchayat Election
Market Committee Election : बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी शुक्रवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()