Market Committee Election : जिल्ह्यातील 13 बाजार समित्यांच्या निवडणुका 3 जानेवारीपर्यंत स्थगित

Market Committee Election News
Market Committee Election Newsesakal
Updated on

नाशिक : राज्यासह नाशिक जिल्ह्यातील नाशिक वगळता १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत शुक्रवारपासून (ता. २३) बाजार समितीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार असतानाच बाजार समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती मिळाली आहे.

नागपूर खंडपीठात झालेल्या ४४ बाजार समित्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत ३ जानेवारी २०२३ पर्यंत निवडणुका स्थगित ठेवण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. यांसह इतर याचिकांच्या आधारावर सहकार प्राधिकरणाने राज्यातील सर्व बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याबाबत कळविले आहे. (Elections of 13 market committees in district postponed till January 3 Nashik News)

राज्यासह जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. यात २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होऊन २९ जानेवारी २०२३ ला बाजार समितीसाठी मतदान होणार होते. असे असताना जिल्ह्यातील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १५ मार्च २०२३ पर्यंत स्थगित करण्याचे न्यायालयाने आदेश दिले.

नाशिक बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील तीन तालुक्यांतील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या असून, या निर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना बाजार समितीची निवडणूक लढविण्याच्या हक्कापासून वंचित राहावे लागेल. नाशिक बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलावी, अशी याचिका तालुक्यातील सदानंद नवले यांनी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.

या याचिकेवर झालेल्या सुनावणीत नाशिक बाजार समितीची निवडणूक १५ मार्चनंतर घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश आलेले असताना दुसरीकडे लासलगाव, पिंपळगाव, येवला, चांदवड व कळवण बाजार समित्यांसह राज्यभरातील ४० बाजार समित्यांनीदेखील नागपूर खंडपाठीत याचिका दाखल केली होती. या याचिकेत झालेल्या सुनावणीत निवडणुका ३ जानेवारी २०२३ पर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश २१ डिसेंबरला देण्यात आले.

या संदर्भासह विविध याचिकेवरील सुनावणीचा संदर्भ देत सहकार प्राधिकरणाने राज्यात सुरू असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका ३ जानेवारी २०२३ पर्यंत स्थगित करत असल्याचे पत्र जिल्हा उपनिबंधक कार्यालयांना दिले आहे. नाशिक उपनिबंधक कार्यालयास सदर पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे १३ बाजार समित्यांच्या निवडणूक कार्यक्रम स्थगित झाला आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Market Committee Election News
Nashik Corona Update : कोरोना पार्श्वभूमीवर NMCने वाढविल्या चाचण्या!

३ जानेवारीच्या सुनावणीकडे लक्ष

बाजार समित्यांच्या निवडणुका ३ जानेवारीपर्यंत घेऊ नये, असे आदेश असल्याने स्थगित आहे. राज्यभरातून विविध बाजार समित्यांनी दाखल केलेल्या याचिका तसेच राज्य शासनाच्यावतीने देखील नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्रक दाखल केले आहे. यावर ३ जानेवारी २०२३ ला अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. यातच निवडणुका पुढे घ्यायचा की नाही, याबाबत आदेश मिळू शकतील.

निवडणूक स्थगित झालेल्या बाजार समित्या

नाशिक बाजार समितीची निवडणूक १५ मार्च २०२३ पर्यंत स्थगित आहे. या शिवाय लासलगाव, पिंपळगाव, येवला, चांदवड, कळवण, मनमाड, नांदगाव, सिन्नर, घोटी, देवळा, सुरगाणा, दिंडोरी, मालेगाव या बाजार समित्यांच्या निवडणुका आता स्थगित झाल्या आहेत.

Market Committee Election News
Nashik Corona Update: Covishieldचा जिल्ह्यात तुटवडा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ZP आरोग्य विभाग दक्ष!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.