Nashik Crime: टेस्ट ड्राईव्हला नेलेली इलेक्ट्रिक कार घेऊन पसार

Crime News
Crime Newsesakal
Updated on

Nashik Crime : पाथर्डी फाटा परिसरातील शोरुममधून टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने भामट्याने सुमारे २० लाख रूपये किमतीची इलेक्ट्रीक कार पळवून नेल्याचा प्रकार घडली.

बराच वेळ होऊनही संशयित कारसह परत न आल्याने वितरकाने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (electric car taken for test drive stolen Nashik Crime)

मनोज प्रकाश साळवे असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी कपील अशोक नारंग (रा. सिरीन मेडोज, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, नारंग यांचे पाथर्डी फाटा भागात कार मॉल नावाचे शोरूम आहे.

इलेक्ट्रीक कार खरेदीचा बहाणा करून शोरूममध्ये आलेल्या संशयित साळवे याने विविध कारची व किमतींची माहिती घेतली. १९ लाख रूपये किमत असलेल्या इलेक्ट्रीक कार (जीजी २६ एबी ४८४८) त्याने पसंत केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Nashik Cyber Crime: पॅनकार्ड अपडेटच्या नावाखाली सव्वाचार लाखांची फसवणूक; संशयिताने पर्सनल लोन घेत घातला गंडा

यावेळी त्याने टेस्ट ड्राईव्हची इच्छा व्यक्त केल्याने नारंग यांनी कार त्याच्या ताब्यात सुपूर्द केली. सदरची घटना मंगळवारी (ता. २२) दुपारच्या सुमारास घडली.

पाच ते सात तास उलटूनही संशयित कार न परतल्याने नारंग यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.

Crime News
Nashik Crime: आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोघांना 2 दिवस कोठडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.