Electric Charging Station : इमारतींमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन बंधनकारक

Electric vehicle charging station
Electric vehicle charging stationesakal
Updated on

नाशिक : शहरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या अशा प्रकारच्या वाहनांच्या चार्जिंगसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची मानसिक व आर्थिक क्षमता महापालिकेची नाही. मुळ सेवा उपलब्ध करण्यापासून लक्ष विचलित होणार असल्याने महापालिकेकडून आता पंचवीसपेक्षा अधिक सदनिका असलेल्या निवासी व व्यावसायिक इमारतींना बांधकाम परवानगी देताना इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Electric charging stations are mandatory in buildings Nashik News)

अशा स्थितीत वाहनांमुळे व होणाऱ्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा मोठया प्रमाणावर ऱ्हास होत आहे. तसेच पेट्रोल, डिझेल उत्पादनांचा भविष्यात होणारा तुटवडा त्यामुळे मोठया प्रमाणात होणाऱ्या प्रदूषणामुळे शासन स्तरावर इलेक्ट्रिक वाहन वापरण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती होत आहे. भविष्यात प्रदूषणाला आळा घालण्यासाठी चार्जिंग पॉइंटची तरतूद करणे बंधनकारक आहे.

त्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात इमारत बांधकाम परवानगी देताना इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन विकसकाने करणे आवश्यक असल्याचे मत नोंदवत महापालिका प्रशासनाने २५ किंवा त्यापेक्षा अधिक सदनिकेच्या निवासी तसेच संपूर्णतः वाणिज्य वापर असलेल्या इमारतींना विकसकाने चार्जिंग पॉइंटची तरतूद करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. इमारत बांधकाम परवानगी प्रारंभ प्रमाणपत्रात तशी अट नमूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जुन्या इमारतींनाही बंधनकारक

ज्या जुन्या इमारतींना यापूर्वी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला असेल त्यापैकी ज्या इमारतींचा १ जून २०२२ नंतर बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्याकरिता प्रस्ताव सादर होईल. त्या इमारतींनादेखील इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग पॉइंट बंधनकारक आहे.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

Electric vehicle charging station
Nashik News : बळीराजाला ऐन हंगामात MSEDCLचा वीजतोडणीचा शॉक!; पाणी असूनही शेतकरी अडचणीत

येथील होणार चार्जिंग स्टेशन

महापालिकेच्या पातळीवरदेखील २० चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. त्यासाठी शासकीय कार्यालयांना जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. एसटी महामंडळ, जिल्हा न्यायालय, जिल्हा परिषद, महापालिका मुख्यालयासह सहा विभागीय कार्यालये तसेच ज्या शासकीय कार्यालयांमध्ये अधिक गर्दी होते, अशा ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. शहरात स्मार्टसिटी कंपनीकडून पार्किंग स्टेशन उभारण्यात आले आहे. त्या पार्किंगच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे.

अ.क्र. सदनिका/वाणिज्य चार्जिंग पॉइंट संख्या

१ २५ ते ५० सदनिका एक
२ ५१ व वरील सदनिका दोन
३ वाणिज्य पाचशे चौरस मीटरपर्यंत क्षेत्र दोन
४ वाणिज्य ५०० चौरस मीटरवरील क्षेत्र चार

Electric vehicle charging station
Onion Prices Fall: कांद्याचे दर 50 टक्क्यांनी घसरले; अवघ्या 20 दिवसात किमतीत घट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.