Nashik News : चांदवडला इलेक्ट्रिक दुकानास आग; जवळपास 25 लाखाच्या वस्तू जळून खाक!

Store material burnt in fire.
Store material burnt in fire.esakal
Updated on

चांदवड (जि. नाशिक) : चांदवड येथील रेणुका कॉम्प्लेक्स येथे श्री. गजानन इलेक्ट्रॉनिक्स यांचे इलेक्ट्रिक दुकान आहे. या दुकानास सोमवारी (ता.१२) रात्रीच्या सुमारास आग लागली. दुकानास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या दुकानास आग लागल्यामुळे इलेक्ट्रिक वस्तूंचे जवळपास २४ ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. (Electric Shop Fire at chandwad Nearly 25 lakh worth of goods burnt Nashik Latest Marathi News)

संदीप सोंनकुळे यांचे दुकानात एलईडी टीव्ही, होमथिएटर, कारटेप, बॅटरी, रिमोट, मिक्सर यासारख्या अनेक वस्तूंचे नवीन व रिपेरिंग करण्याच्या वस्तू होत्या. जवळच फर्टीलायझर्सचे छोटेसे गोडाऊन होते. त्याचे देखील वीस ते पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रात्री साधारणत: बारा ते साडेबाराच्या दरम्यान, ही आग लागली असावी असा अंदाज असून दुकानाचे संचालक ज्ञानेश्वर लक्ष्मण पवार, आसरखेडे यांना रात्री दोनच्या सुमारास माहिती कळताच दुकानाकडे धाव घेतली.

चांदवड टोलप्लाझा येथील अग्निशमन दलातर्फे आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, आगीने इतका भडका घेतला होता की, आग विझून देखील सर्व मालाचा कोळसा झालेला होता. यात एलईडी टीव्ही, स्पीकर, साउंड सिस्टिम, ॲम्प्लिफायर, होमथिएटर, कारटेप, बॅटरी, रिमोट, सीलिंग फॅन, टेबल फॅन, मिक्सर, इस्त्री, लहान मोठे केबल बंडल व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश असून सर्व वस्तू जळून खाक झाल्याने मोठा तोटा सहन करावा लागेल.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Store material burnt in fire.
Dhule News : रेल्वेक्षेत्र मोजणी स्थिती; 9 गावांमधील मोजणी पूर्ण

त्यासह व्यापारी वर्गाचे आठ ते दहा लाख रुपये कर्ज, आठ हजार रुपयांचे गाळाभाडे, अनेकांना उधारीत दिलेल्या वस्तूची यादी व त्यांची बिले हे देखील जळालेले असल्याने ज्ञानेश्वर पवार यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

पंचनामा झाला खरा पण पदरात काय पडणार ?

दुकानाला आग लागल्याचे वृत्त समजल्यानंतर चांदवड तलाठी जैस्वाल, वीज वितरण कंपनीचे अभियंता व इतर कर्मचारी, पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर आदींनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा देखील केला.

Store material burnt in fire.
Postal Department Recruitment : डाक विभागात जीवन विमा अभिकर्त्यांची थेट भरती; या आहेत अटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.