नाशिक : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सुमारे १० हजार कोटी रुपयांचा महिंद्र अँड महिंद्र कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्प होणार असल्याची माहिती दिली होती.
मात्र, आता नाशिकमध्ये होणारा हा प्रकल्प पुण्यात होणार असल्याची माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उद्योग मंत्री सामंत यांनी लेखी उत्तरात दिली आहे. (Electric vehicle project of Mahindra Company shift tp Pune Industry Minister Samants reply to former minister Chhagan Bhujbals question nashik News)
छगन भुजबळ यांनी सभागृहात दाओस येथे जागतिक आर्थिक परिषदेत शासनाने केलेल्या सामंजस्य कराराबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्या प्रश्नात त्यांनी म्हटले आहे की, दाओस येथील जागतिक आर्थिक परिषदेत शासनाने जगभरातील विविध कंपन्यांसोबत १.३७ लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केल्याचा दावा राज्य शासनाने केला.
त्यामध्ये महिंद्र अँड महिंद्र कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रामध्ये १० हजार कोटींची गुंतवणूक करणाऱ्या प्रकल्पाचा विस्तार नाशिकमध्ये होणार असल्याचे राज्य शासनाने अधिकृतरीत्या जाहीर केले.
परंतु, हा विस्तार नाशिकऐवजी अहमदनगर येथे होणार आहे का? त्यावर लेखी उत्तरात मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे की, दाओस येथील जागतिक आर्थिक परिषदेत शासनाने जगभरातील विविध कंपन्यांसोबत १.३७ लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहे.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
यामध्ये नाशिक येथे महिंद्र अँड महिंद्र कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्प होणार नाही. तर महिंद्र इलेक्ट्रीक व्हेईकल ऑटोमोबाईल लि. घटक हा सनराईज सेक्टरमधील असून, इलेक्ट्रीक व्हेईकल निर्मिती हा उच्च तंत्रज्ञानावर आधारित या क्षेत्रातील प्रकल्प आहे.
देशांतर्गत इलेक्ट्रीक व्हेईकलमध्ये १० हजार कोटींची गुंतवणूक असणारा हा प्रकल्प असून, सदर प्रकल्प पुणे येथे स्थापित होणारा नविन प्रकल्प आहे, अशी माहिती त्यांनी उत्तरात दिली. यामुळे नाशिकवर पुन्हा अन्याय झाल्याची भावना माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.