Electricity
Electricity sakal

Nashik Electricity News : पावसाअभावी विजेचे संकट गडद; मागणी 27 हजार 500 मेगावॉटवर

Published on

Nashik Electricity News : राज्यात पावसाने वक्रदृष्टी फिरविल्याने अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती ओढवली आहे. त्यात विजेची मागणी २८ हजारांच्या घरात पोहोचल्याने नाशिकचा तिसरा संचही सुरू करण्यात आला.

पावसाने ओढ दिल्याने उष्णतेत वाढ झाली. त्यामुळे पंखे, वातानुकूलन यंत्रे, कूलर अशी घरगुती विजेसह कृषिपंपांची मागणी वाढल्याने काही दिवसांतच विजेची मागणी किमान सहा हजार मेगावॉटने वाढली आहे. (Electricity demand at 27 thousand 500 MW in nashik news)

अशात कोराडी येथील संच क्रमांक १० वार्षिक देखभालीसाठी तसेच चंद्रपूर येथील संच चार व पाच हे दोन संच बंद आहेत. सप्टेंबरमध्ये पाऊस झाला नाही, तर पाण्याअभावी काही ठिकाणचे संच बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते.

पाच वर्षांपूर्वी पाण्याअभावी परळीचे सर्व संच बंद ठेवण्यात आल्याने वीजनिर्मिती शून्यावर आली होती. वीजनिर्मिती अडचणीत असल्यावर नाशिकने कायम साथ दिली आहे.अव्वल कामगिरी करणारे येथील संच व कार्यक्षम मनुष्यबळ असताना नाशिकला प्रस्तावित बदली संच दिले जात नाहीत, हे नाशिकचे दुर्दैव म्हणावे लागेल.

आज सकाळी विजेची मागणी २७ हजार २२४ इतकी होती. राज्याच्या सर्व स्रोतांतून वीजनिर्मिती १६ हजार ६३२ मेगावॉट इतकी सुरू होती. दहा हजार मेगावॉट केंद्राकडून घेऊन गरज भागवली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Electricity
Nashik Trimbakeshwar News : तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी 250 बसगाड्या; जाणून घ्या बसचे नियोजन

त्यात नाशिक ३९० मेगावॉट, कोराडी ११६७, खापरखेडा ९३५, पारस ३८५, परळी ५८५, चंद्रपूर १५३४, भुसावळ ७३४ मेगावॉट अशी औष्णिकची, जलविद्युत ७१२, सौर ७७, उरण वायू प्रकल्प २८० मेगावॉट अशी महानिर्मितीची सात हजार २६४ व सात हजार ९७४ मेगावॉट अशी खासगी केंद्रांची वीज सुरू होती. येत्या काळात पावसाने दडी मारली तर राज्यात भारनियमन मात्र अटळ आहे.

'राज्यात पावसाअभावी विजेची मागणी वाढल्याने तिसरा संच सुरू करण्याच्या सूचना आल्याने काल मध्यरात्रीपासून तिसऱ्या संचातून वीजनिर्मिती सुरू झाली." - प्रफ्फुल भदाणे, मुख्य अभियंता

"राज्यात जेव्हा विजेचे संकट येते, तेव्हाच नाशिक औष्णिक वीज केंद्रातील तिसरा संच सुरू करण्याची आठवण येते. चाळिशीतील संच उत्तम काम करतात, मग येथे नवीन संच देण्यास अडचण काय?"- अरुण दुशिंग, सरपंच

Electricity
Jalna Maratha Protest : जालना येथील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी कडून खबरदारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()