Gudhi Padwa 2024: वाढत्या उष्णतेमुळे एसी, कुलरच्या विक्रीत वाढ! गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक बाजाराला झळाळी

Nashik News : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेत गारवा मिळावा यासाठी एसी अन् कुलर खरेदीकडे नाशिककरांची कल वाढू लागला आहे.
Electronics Business
Electronics Businessesakal
Updated on

नाशिक : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेत गारवा मिळावा यासाठी एसी अन् कुलर खरेदीकडे नाशिककरांची कल वाढू लागला आहे. विविध कंपन्यांच्या एसीसह, फायबर, स्टील, लोखंडी कुलर बाजार विक्रीसाठी दाखल झाले असून नागरिक आपल्या आर्थिक क्षमतेनुसार खरेदी करत आहेत. यंदा एसी, कुलरचे दर स्थिर असून विक्रीत वाढत्या उष्णतेमुळे दुपटीने वाढ झाल्याचे विक्रेते दावा करीत आहे. (Electronics Business Increase in sales of AC cooler Gudi Padwa marathi news)

मागील काही दिवसापासून शहरातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना गारव्यासाठी एसी, कुलरची आवश्यकता भासू लागली आहे. एसी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारा ठरतो. एसीची किंमत, त्यामुळे येणारे वाढीव वीजबिल अन् त्याचा देखभाल खर्च यामुळे लोखंडी कुलरला सर्वसामान्यांची अधिक पसंती आहे. अडीच हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत लोखंडी कुलर बाजार विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

लोखंडी कुलरमुळे एसी प्रमाणे गारवा मिळतो, यामुळे वीज बिलावरही फारसा परिणाम होत नाही अन् देखभाल खर्चही कमी आहे. त्यामुळे लोखंडी कुलरच्या खरेदीकडे मोठा कल नागरिकांचा आहे. या कुलरसह बाजार विविध कंपन्यांचे एसी विक्रीसाठी उपलब्ध असून २० ते ६० हजारांपर्यंत घरगुती एसीची किंमत आहे. तर फायबर कुलर देखील ४ ते २० हजारांपर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

स्टील कुलर पसंती

सर्वसामान्य नागरिक लोखंडी कुलरचा पर्याय नाकारून संपुर्ण स्टील पासून निर्मित कुलरला पसंती देत आहेत. कुलरची बॉडी स्टील पासून बनविलेली असल्याने लोखंडाप्रमाणे त्याला गंज लागत नाही. त्यामुळे लोखंडी कुलरच्या तुलनेत स्टील कुलरचे आयुर्मान अधिक असते त्यामुळे स्टील कुलरला ग्राहकांची पसंती आहे. स्टील कुलरची किंमत चार ते पंधरा हजारांपर्यंत असल्याचे विक्रेते सुनील देवरे यांनी सांगितले.

Electronics Business
Chala Karu Matdaan: "चला करु मतदान"; 'खास रे टीव्ही'चं भन्नाट गाणं एकदा ऐकाच!

गुढीपाडव्याच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक बाजारात झळाळी

गुढी पाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर टिव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन यासह मोबाईल, लॅपटॉप, टॅब, स्मार्टवाच यांसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या खरेदीसाठी ग्राहक गर्दी करू लागले आहेत. विक्रेत्यांकडून विविध प्रकारच्या योजनांद्वारे कर्ज व हप्त्याची सोय करून दिली जाते, क्रेडिट कार्ड, फायनान्स याद्वारे कॅशलेस खरेदी केल्यास ग्राहकांना त्वरित कॅश बॅक मिळत असल्याने ग्राहकांना खरेदी करताना अधिक लाभ होत आहे. त्यामुळे गुडीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक बाजाराला चांगलीच झळाळी आली आहे.

ऑनलाइन खरेदीला ग्राहकांची बगल

यापूर्वी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिक खरेदी करताना ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करायचे. मात्र त्यातून होणारी फसवणूक व वस्तू विकत घेताना तिचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही, त्यामुळे ग्राहकांचा कल बाजारात खरेदी करण्याकडे वाढला आहे अशी माहिती विक्रेते संदीप बाफणा यांनी दिली.

"लोखंडीसह स्टील कुलरला मागणी आहे. यंदा कुलरच्या दरांत वाढ नाही. त्यामुळे ग्राहकांना देखील याचा लाभ होत आहे."- सुनील देवरे, धनदाई कुलर्स.

"यंदा उन्हाचा तडाखा वाढल्याने एसी, फायबर कुलरची चांगलीच डिमांड आहे. मे महिन्यापूर्वीच पहिल्या लॉटची विक्री झाली असून यंदा विक्रीत दुपटीने वाढ होईल अशी खात्री आहे."

- संदीप बाफणा, बाफणा इलेक्ट्रॉनिक्स

Electronics Business
Family Time: मुलांना द्या 'क्वालिटी टाईम', डायरीमध्ये आनंदी क्षण टिपण्याची लावा सवय...होईल मोठा फायदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.