नाशिक : जिल्हा कुपोषण मुक्त करण्याच्या उद्देशाने पावले टाकली जात असून कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषद आणि आयआयटीच्या पुढाकाराने ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे शुक्रवारी (ता.१४) जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग आणि आयआयटी मुंबई यांच्यावतीने तालुका आरोग्य अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आयआयटी मुंबई येथील प्राध्यापिका डॉ. रूपल दलाल, प्रा. डॉ.कानन मुदगल्या, महिला व बालकल्याण विभाग जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहते आदी उपस्थित होते.(Elimination Malnutrition Ready action plan for malnutrition by District Council and IIT Nashik News)
डॉ. दलाल म्हणाल्या की, बाळाची आई गरोदर असल्यापासून पुढील एक हजार दिवस अतिशय महत्त्वाचे असतात, गरोदर मातांना या काळात स्वतःच्या व बाळाच्या आहाराचे योग्य मार्गदर्शन केल्यास कुपोषणाच्या समस्येवर निश्चितच मात होते. आयआयटी मुंबईच्यावतीने गुजरात येथील आदिवासी भाग, मेळघाट येथील बालकांच्या कुपोषण निर्मूलनाच्या यशस्वी प्रयोगांबद्दल माहिती दिली.
श्रीमती. मित्तल यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगत जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी आयआयटी मुंबई येथील तज्ज्ञ अभ्यासकांची मदत घेण्यात येणार असून पुढील काळात आशा सेविकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात येईल. तसेच कुपोषण निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. यशस्वितेसाठी महिला व बालकल्याण विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी संजय सोनवणे, रवींद्र देसाई, विस्तार अधिकारी सांख्यिकी योगेश भोये, संजय मोरे, परिचर विश्वजित खैरे, सारिका गायकवाड आदींनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.