Nashik : स्थानिक दुकानातून खरेदी करण्याची व्यावसायिकांची ग्राहकांना भावनिक साद

Emotionally appealing billboards in the marketplace
Emotionally appealing billboards in the marketplaceesakal
Updated on

जुने नाशिक : ऑनलाइन खरेदीपेक्षा नागरिकांनी स्थानिक बाजारपेठेतील दुकानांमधून खरेदीचा आनंद घ्यावा. स्थानिक दुकानदार सदैव नागरिकांच्या मदतीला धावून आला आहे. याचा विचार करता स्थानिक दुकानातूनच खरेदी करावी, अशी भावनिक साद व्यवसायिकांकडून ग्राहकांना घालण्यात आली आहे. (emotional appeal of businessman to consumer of buying from local store in diwali 2022 Nashik Latest Marathi News)

Emotionally appealing billboards in the marketplace
Dada Bhuse : अवकाळीच्या नुकसानीचे जागेवर पंचनामे : पालकमंत्री दादा भुसे

बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच डिजिटल युगात वावरत असल्याचा अभिमान यामुळे अनेक गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. खरेदीची पद्धतदेखील बदलली आहे. बहुतांशी नागरिक स्थानिक दुकानांना विसरत ऑनलाइन खरेदी करत आहे. प्रत्येक वस्तू घरपोच मिळत असल्याने गेल्या काही दिवसात ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेड अधिकच वाढला आहे. याचा परिणाम स्थानिक दुकानदारांवर होत आहे. कोरोना सारख्या संकटात स्वतःच्या जिवाची परवा न करता स्थानिक दुकानदारांनी दैनंदिन गरजेची प्रत्येक वस्तू नागरिकांपर्यंत पोचवली आहे.

त्या वेळी ऑनलाइन खरेदी सेवादेखील कोलमडली होती. तरीदेखील आपण कुटुंबाचा एक भाग आहोत या जाणिवेतून त्यांनी रात्री अपरात्री, अडचणीच्या काळात स्थानिक दुकानदार नागरिकांच्या मदतीसाठी धावला आहे. नागरिक स्थानिक दुकानदारांकडून करत असलेल्या खरेदी विक्रीवरच दुकानदाराचे कुटुंबदेखील अवलंबून आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक दुकानदारांबाबत आपली जबाबदारी ओळखत दिवाळीचे निमित्ताने बाहेर पडावे. बाजारपेठेस पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून द्यावे.

स्थानिक दुकानातून विविध प्रकारच्या खरेदीचा आनंद घ्यावा, अशी भावनिक साद स्थानिक व्यावसायिकांकडून घालण्यात आली आहे. नाशिक डिस्ट्रिक डिस्ट्रीब्यूटर अॅन्ड रिटेल असोसिएशन अप्लायन्सेस ॲन्ड क्रॉकरी यांच्याकडून अशा आशयाचे नागरिकांना साद घालणारे फलक बाजारपेठेत ठिकठिकाणी लावले आहे. तसेच सोशल मीडियावरदेखील अशा आशयाचा संदेश प्रसारित केला जात आहे.

Emotionally appealing billboards in the marketplace
Nashik : वायुसेनेच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.