येवला (जि. नाशिक) : शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपात दुसऱ्या दिवशी बुधवारीही (ता. १५) सर्वांनी सहभाग नोंदवला. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सर्व विभागांतील शासकीय व निमशासकीय कर्मचारी, तसेच शिक्षक संघटना संपात सहभागी झाल्या आहेत.
दरम्यान, येथील पंचायत समिती कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी शासनाने काढलेल्या जीआरची होळी करत जोरदार घोषणाबाजी केली. (Employees Strike Holi of government GR employees teachers participated in strike on second day at yeola nashik news)
येथील महसूल, कृषी, ग्रामसेवक, आरोग्य विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आदींसह सर्वच कर्मचाऱ्यांनी बुधवारी संपात सहभाग नोंदविला. त्यामुळे तहसीलसह अनेक कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता.
पंचायत समिती कार्यालयासमोर अनेक विभागातील शासकीय कर्मचारी व शिक्षकांनी ठिय्या मांडत संप सुरू ठेवला. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नाही, असा पवित्रा कर्मचारी व शिक्षकांनी घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, ग्रामसेवक संघटना, तलाठी महासंघ, आरोग्य सेवक संघटना, माध्यमिक शिक्षक महासंघ, माध्यमिक मुख्याध्यापक संघटना, समता प्रतिष्ठान संघटना, शिक्षक भारती, महसूल कर्मचारी संघटना आदी संघटना, समन्वय समिती पदाधिकारी व तालुक्यातील सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर एकत्रित येत धरणे आंदोलन केले.
दरम्यान, गुरूवारी (ता. १६) नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वय समितीतर्फे करण्यात आले.
हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
कर्मचारी संघटनेचे नेते रविंद्र शेलार, शांताराम काकड, संजय दराडे, अनिल महाजन, महेश पवार, उदय कुऱ्हाडे, काझी, संतोष चव्हाण, राजेंद्र कोतकर, राहूल गांगुर्डे, गोपाल तिदार, दिलीप जोंधळे, प्रमोद देव्हढे, सविता जाधव, स्वाती डेरे, सोनाली मारकड, वंदना शिंपी, मनिषा पाटील, स्वाती वारूंगळे, जयश्री पालवे आदींसह ग्रामसेवक, आरोग्य विभाग, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दराडेंकडून पाठिंबा
पेन्शन म्हणजे म्हातारपणाची काठी आहे. शिक्षकांसह सर्वांना पेन्शन मिळावी, या मागणीशी मी सहमत असल्याचे सांगत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी संपास जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचा वृद्धापकाळातील आधार शासनाने हिसकावून घेतला आहे.
मध्यवर्ती संघटना व इतर संघटनांतर्फे शासनाकडे वेळोवेळी चर्चा व निवेदने, आंदोलने, मोर्चे, तसेच शासन स्तरावर पाठपुरावा केला. परंतू, कर्मचाऱ्यांची ही मागणी दीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. त्यामुळे या बेमुदत संपास पाठींबा जाहिर केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.