Government Rural Employment : शासनातर्फे ग्रामीण तरुणांना रोजगार

कौशल्य विभाग, लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनचा पुढाकार
Employment
Employmentesakal
Updated on

नामपूर (जि. नाशिक) : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सुशिक्षित तरुणांना थेट ग्रामीण भागातच रोजगार उपलब्ध करून देण्याची अनोखी योजना राज्यशासनाने आखली आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योगजकता आणि नाविन्यता विभाग आणि लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या सहयोगाने राज्यातील मागास जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात रोजगारासह कुशल मनुष्यबळाचा विस्तार करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.

आगामी काळात ‘लाईटहाऊस : कौशल्य आणि उपजीविका केंद्र’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कार्यक्रमाद्वारे कमी उत्पन्न असलेल्या आदिवासी, दुर्गम, ग्रामीण भागातील समुदायांसोबत काम करणार आहे. (Employment for rural youth by government nashik news)

राज्याच्या ग्रामीण भागातील अत्यल्प उत्पन्न असलेल्या तरुण-तरुणींना रोजगारासह कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासन आणि लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला.

संबंधित आयुक्त डॅा. रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश नटराजन, सीईओ रूची माथूर यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Employment
Nashik News : गोदापात्रातील तळ काँक्रिट काढण्यास सुरवात; नदीपात्रातील जैवविविधताही दृष्टीस

या योजनेच्या माध्यमातून तरुणांना सशक्त करणे आणि त्यांच्यात क्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. या सहभागातून, लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन संपूर्ण राज्यामध्ये केंद्रांच्या माध्यामातून कार्यक्रम राबवले जाणार आहे. यात १८ ते ३५ वयोगटातील ग्रामीण तरुण वर्गाचा समावेश असलेल्या आकांक्षी जिल्ह्यांना प्राधान्य देईल. हा सहा महिन्यांचा कार्यक्रम असेल.

"ग्रामविकास, तरुणांना रोजगारनिर्मिती याबाबत शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रोजगाराच्या पुरेशा संधी मिळत नाहीत. गावात असलेले कुटीर उद्योग, लघु उद्योग आणि शेतीशी संबंधित उद्योग अलीकडच्या काळात कमी झाले आहेत."

-अभिजित देवरे, सामाजिक कार्यकर्ते

Employment
Eklavya Ashram School Case : मुदतीआधीच आदिवासी आयुक्तांकडून अनुसूचित जनजाती आयोगाला खुलासा सादर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.