Nashik News: अतिक्रमित भाजी बाजार रस्त्यावर लावणार फलक

vegetable market
vegetable marketesakal
Updated on

Nashik News : सध्या नाशिक रोडला मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. नाशिक रोड हे व्यापारी पेठेचे केंद्र आहे. या ठिकाणी भाजीवाले अवैध पद्धतीने व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर भाजी विक्रीसाठी बसतात.

पर्यायाने व्यापाऱ्यांच्या दुकानात गिऱ्हाईक येत नाही. यामुळे नाशिक रोडमधील निवडक गर्दीच्या रस्त्यांवर नो- हॉकर्स झोनचा फलक लावून कायमस्वरूपी भाजीपाला विक्रेत्यांना मज्जाव करण्यात येणार आहे. (Encroached vegetable market will put up signs on road Nashik News)

नाशिक रोडचे विभागीय अधिकारी हरिश्चंद्र मदन यांच्या संकल्पनेतून सध्या नाशिक रोडला विविध नवीन प्रयोग राबवले जात आहे. त्यामध्ये राजेंद्र कॉलनी अण्णा हजारे मार्ग, शाहूपथ, मशीद रोड.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या दाटीच्या लोकवस्तीत सध्या भाजी विक्रेते दुकानांसमोर ठाण मांडून बसतात. पर्यायाने व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये ग्राहक येत नाही. ग्राहकांना गाडी लावायला जागा राहत नाही.

रहिवासी आणि व्यापारी परिसरात भाजीवाल्यांनी नाशिक रोडला अतिक्रमण केले आहे. भाजी विक्रीतून अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे गुन्हे नाशिक रोड पोलिस स्टेशनला दाखल झालेले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

vegetable market
NMC School News : बांधकाम विभागाचा शाळा दुरुस्तीकडे काणाडोळा; महापालिकेच्या 30 शाळा नादुरुस्त

सध्या नाशिक रोडचे व्यापाऱ्यांनी नाशिक महापालिकेकडे तक्रारी नोंदविल्या आहेत. महापालिकेला कर भरूनही महापालिका अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवत नाही.

म्हणून नाशिक रोडच्या विभागीय अधिकाऱ्यांनी स्वतः यात लक्ष घालून भाजीपाला अनधिकृत विक्री रस्त्यावर फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे.

"अण्णा हजारे मार्ग राजेंद्र कॉलनी, शाहूपथ या ठिकाणी भाजी विक्रेत्यांनी बसू नये. ही व्यापारी आणि रहिवासी वस्ती आहे. हे भाजी विक्रीचे ठिकाण नाही. रोज अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली जाणार असून, या ठिकाणी महापालिका लवकरच फलक लावणार आहे."

- हरिश्चंद्र मदन, विभागीय अधिकारी

vegetable market
NMC News : राज्याच्या कार्यालयांना घरपट्टी, तर केंद्रीय कार्यालयांना सेवा कर! महापालिका करणार करार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.