Nashik News : प्रभाग क्रमांक ३१ मधील सदिच्छानगर येथे सर्व्हे क्रमांक ८९०/२३/१ मध्ये महापालिकेच्या क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या सुमारे ७७२ वार जागेवर झालेले अतिक्रमण महापालिकेतर्फे ४ जानेवारी २०२३ ला रोखण्यात आल्यानंतरदेखील संबंधित बांधकाम व्यावसायिकाने बुधवारी (ता.१४) पुन्हा या जागेत अतिक्रमण सुरू केले.
यामुळे माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे यांनी मनपा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. १० हजार चौरस मीटर जागा येथे क्रीडांगणासाठी आरक्षित आहे. (Encroachment again on nmc plot of Sadichchanagar Opposition to start of construction of fence Nashik News)
३ जानेवारी २०२३ ला ॲड. बडोदे यांनी या जागेत होणारे अतिक्रमित बांधकाम बंद पाडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपअभियंता उद्धव गांगुर्डे, भूसंपादनाचे उपअभियंता जयवंत राऊत, अधिकृत सर्वेअर जाधव आणि सात्रल यांच्यासह महापालिकेच्या प्रशासनाने संबंधित जागेवर येत रीतसर मोजणी करून २००७ च्या नगर रचना कागदपत्रानुसार ही सुमारे २३ फूट रुंद आणि ९२ मीटर लांब जागा महापालिकेचीच असल्याचे स्पष्ट केले होते.
ही जागा क्रीडांगणासाठी राखीव असल्याचे नमूद केले होते. संबंधित व्यावसायिकाला त्या वेळी त्यांनी केलेले अतिक्रमित बांधकाम काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अधिकृत खुणादेखील करण्यात आल्या होत्या.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मात्र बुधवारी पुन्हा एकदा पाच ते सहा फूट आत या व्यावसायिकाने कुंपणाचे बांधकाम सुरू केल्याने ॲड. बडोदे यांनी त्याला विरोध केला आणि हे काम बंद करण्यास सांगितले. त्यानंतर बडोदे यांनी उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांना निवेदन देत मागील सर्व परिस्थिती आणि कागदपत्रे दाखवत विषयाचे गांभीर्य समजावून सांगितले.
त्यांनीदेखील तातडीने यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, हे अतिक्रमण होण्याचा कायमस्वरूपी धोका लक्षात घेता महापालिकेने तातडीने येथे प्रस्तावित असलेले क्रीडांगण विकसित करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची अपेक्षा ॲड. बडोदे यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.