नाशिक : सातपूर परिसरातील केवल पार्कमधील चार घरे जमीनदोस्त करून मनपा (NMC) अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत किरकोळ मोहिमा राबविणाऱ्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने (Encroachment Elimination Squad) अतिक्रमण विरोधात ही मोहीम सुरू केली. सातपूर परिसरातील अंबड लिंक रोडवरील केवल पार्क येथील १४ घरांपैकी चार अनधिकृत पक्की घरे जमीनदोस्त करण्यात आली. (encroachment campaign in Satpur Nashik News)
या वेळी जेसीबी व मोठा फौजफाटा असल्यामुळे थोडे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सातपूर अंबड लिंक रोडवरील भाग्यश्री सोसायटीची पार्किंगच्या जागेवर तेथील सुरक्षा रक्षकाने पक्की घरे अतिक्रमण करून बांधली होती. भाग्यश्री सोसायटीत असलेल्या अतिक्रमण विरोधात बिल्डरने तक्रार केली होती. बुधवारी (ता. १८) उपायुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली. केवल पार्क येथील या अनधिकृत बांधकामाचे बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या ठिकाणी केवल पार्कमध्ये एकूण १४ पक्के, काही कच्च्या स्वरूपात घरे असून, ही सर्व घरे अनधिकृत होते. याबाबत महापालिका अतिक्रमण विभागाने संबंधितांना नोटीसही बजावली होती.
नोटीस मिळवूनही अतिक्रमण न काढल्याने बुधवारी अखेर महापालिका अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. या वेळी पंचवटी, नाशिक रोड, सातपूर विभागीय कार्यालयातील, तसेच राजीव गांधी भवन मुख्यालयातील अतिक्रमण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या वेळी दोन जेसीबी, तीन गाड्या, १७ कर्मचारी तसेच १३ पोलिसांनी ही कारवाई केली. नाशिक रोड ६, पूर्व ८, पश्चिम ७, सातपूर ८ याप्रमाणे कर्मचारी सहभागी झाले. महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त तथा प्रभारी अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण सहाय्यक आयुक्त अतिक्रमण तथा विभागीय अधिकारी नितीन नेरे यांनी पार पाडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.