Nashik News : त्र्यंबकेश्‍वरमध्ये अतिक्रमणांची डोकेदुखी; गल्ल्या अरुंद अन् पादचारी मार्ग झालेत बंद!

trambakeshwar
trambakeshwaresakal
Updated on

त्र्यंबकेश्‍वर (जि. नाशिक) : येथील वाढत्या अतिक्रमणांनी डोकेदुखीमध्ये भर घातली आहे. गाळ्यांच्या पुढील भागात व्यवसायाने पादचारी मार्ग बंद केल्याने रोजची हमरीतुमरी शहरभर पाहावयास मिळते. जगभर प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्री भाविकांच्या दर्शनासोबत पूजाविधीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे सगळ्यांची अडचण होत आहे. (Encroachment in Trimbakeshwar Streets narrowed congested traffic Nashik Latest Marathi News)

सह्याद्री पर्वतरांगेतील टुमदार शहर. वीस वर्षे सलग दहा हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या शहराची लोकसंख्या दोन वर्षांत १३ हजारांपर्यंत पोचली. बाहेरून आलेल्यांनी उद्योगधंद्यात जम बसवल्याने ही वाढ झाली आहे. गल्लीबोळांसह शहराच्या बाहेर गुंठेवारीतून सिमेंटच्या इमारती आणि व्यावसायिक गाळे उभे राहिले आहेत. त्यातील अनेक जमिनी राखीव ब्रह्मगिरी पर्वतरांगेतील आहेत.

बिनदिक्कतपणे परवानगी देऊन घरपट्टी लागू करत सुविधा पुरवल्या गेल्यात. मुळात, नवीन विकास आराखडा मंजूर होण्यापूर्वी अनेकांनी इथल्या जमिनीत आपले पाय रोवले. पैसे मिळवण्यासाठी सगळे नियम धुडकावून लावण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर भारताची दुबई अशी आवई उठवत आपले इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न उघड्या डोळ्यांनी शहरवासीयांना पाहावा लागला आहे.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

trambakeshwar
Nashik News: IMAचा वृद्धांना आधार...!; म्‍हसरुळला TB सॅनिटोरियमच्‍या जागेत वृद्धाश्रम

पालिकेतर्फे पूर्वी बांधलेल्या गाळ्यांवर लोकप्रतिनिधींनी दुसऱ्याच्या नावावर, तर काहींनी कुटुंबीयांच्या नावावर आपली मोहर उमटवली. आता रस्त्यात गाळे सोडून पुढे व्यवसाय आणत पादचारी मार्ग बंद केले आहेत. त्यामुळे रोजची भांडणे पाहावयास मिळतात. बाहेरून आलेल्या भाविकांना ओंगळवाणे दृश्‍य पाहत दर्शनासाठी जावे लागत आहे.

रस्ता चालण्यासाठी मोकळा दिसत नाही. भररस्त्यात व्यवसाय चालण्यासाठी ‘चिरीमिरी’चे दर्शन घडवण्यात धन्यता मानली जात आहे. हे सारे एकीकडे घडत असताना सतत गटारी बांधकामाचा धडाका चालला आहे. या साऱ्या गंभीर परिस्थितीकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही, तर जागा उरणार नाही, अशी भीती त्र्यंबकेश्‍वरवासीयांना वाटू लागली आहे.

राखीव शब्द राहणार कागदावर

नवीन हद्दवाढ प्रस्ताव दाखल होण्यापूर्वी योजनाबद्धरीत्या केलेले व्यवहार रडारवर आले आहेत. सर्व व्यवहारांत सरकार आणि यंत्रणांनी लक्ष घालून अतिक्रमण आणि गैरव्यवहार न थांबवल्यास राखीव हा शब्द कागदावर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

trambakeshwar
Nashik News : पक्षी घरात उंदरांचा उपद्रव; पक्षी घराकडे NMCसह पक्षांची पाठ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.