गोदाघाटावर बुधवारी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविताना अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांच्यासह पंचवटी व पश्चिम नाशिक विभागातील आधिकाऱ्यांचे पथक
गोदाघाटावर बुधवारी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविताना अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांच्यासह पंचवटी व पश्चिम नाशिक विभागातील आधिकाऱ्यांचे पथकesakal

नाशिक : महापालिकेच्या रडारवर गोदाघाटावरील अतिक्रमण

Published on

नाशिक : महापालिका आयुक्त रमेश पवार (Municipal Commissioner Ramesh Pawar) यांनी दोन दिवसापूर्वी साध्या वेशात गोदावरी घाटावरील दौरा केल्यानंतर बुधवारी (ता. २०) महापालिका यंत्रणा सतर्क झाली. गोदावरी घाटावर ध्वनिक्षेपकांहून अतिक्रमणधारकांना सूचना करीत फुले पूजा साहित्य विक्रीशिवाय इतर सगळी अतिक्रमणे रडारवर घेतली आहे. गुरुवार (ता.२१) पासून या भागात अतिक्रमण निर्मूलन मोहिमा राबवून साहित्य जप्तीसह दंडात्मक कारवाया सुरू होणार आहे.

हातगाड्या तसेच बेशिस्त हॉकर्सची पाहणी

बुधवारी (ता. २०) सहाय्यक आयुक्त करुणा डहाळे यांच्यासह त्यांच्या विभागाच्या पथकाने गोदाघाट परिसरातील प्रमुख रस्त्यावर फिरून ध्वनिक्षेपकावर सूचना देत मोहीम सुरू केली. सकाळी नऊपासून अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, पश्चिम विभागीय अधिकारी, पंचवटी विभागीय अधिकारी तसेच पूर्व विभागीय अधिकारी यांच्यासह महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवार कारंजापासून थेट गंगाघाट परिसर, कोटेश्वर मंदिर, मेनरोड, दहीपूल, जुनी पांडे मिठाई, यशवंत पटांगण, गौरी पटांगण, बालाजी कोट आदी परिसरात पायी फिरून त्यांनी संपूर्ण परिसराचा आढावा घेतला. डहाळे यांनी गंगाघाट, रामकुंड तसेच पंचवटी भागातील हातगाड्या तसेच बेशिस्त हॉकर्सची पाहणी करून प्रशासनाला सूचना केल्या होत्या. खाद्यपदार्थांसह इतर साहित्य विक्रीची दुकाने थाटलेल्यांचे साहित्य जप्त करण्याचा आज ध्वनिक्षेपकांवरून इशारा देण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक श्री. पवार यांनी गोदावरी घाटावर तीन तास फिरून तेथील पाहणी केली होती.

गोदाघाटावर बुधवारी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविताना अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांच्यासह पंचवटी व पश्चिम नाशिक विभागातील आधिकाऱ्यांचे पथक
नाशिक विभागात भोंग्यांचा आवाज मोजण्याचे आदेश

"गोदाघाटावर खाद्यपदार्थांसह इतर साहित्य विक्रीची दुकान लागणार नाही. सर्वांना सूचना देण्यात आल्या. गुरुवार (ता. २१) पासून कारवाया सुरू होतील. या भागात महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन विभागाचे पथक कार्यरत राहणार असून अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे."
-करुणा डहाळे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

गोदाघाटावर बुधवारी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविताना अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांच्यासह पंचवटी व पश्चिम नाशिक विभागातील आधिकाऱ्यांचे पथक
नाशिक : शेवगा लागवड योजनेतंर्गत प्रतिहेक्टरी ३० हजार अनुदान

साहित्य जप्ती दंडात्मक कारवाई

बंदीस्त हातगाडी, टपरी आदी २७ हजार रुपये
उघडी हातगाडी, स्टॉल, कापडी टेंट ९ हजार रुपये
सोफा पलंग, लोखंडी पाइप, कपाट ९ हजार रुपये
टेबल खुर्च्या, पाट सुरे, बरण्या, भांडे १८०० रुपये (प्रति नग)
साधे वजन काटे, दुकानातील साहित्य १३५० ( प्रतिनग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.