Nashik News : नगररचना विभागाला अतिक्रमणाचे स्मरणपत्र

Accidental Black Spot
Accidental Black Spotesakal
Updated on

Nashik News : औरंगाबाद महामार्गावरील बस दुर्घटनेनंतर ब्लॅक स्पॉटवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी नगर रचना विभागाला रेखांकन करण्याच्या सूचना देऊनही काम होत नसल्याने अतिक्रमण निर्मूलन विभागाने तिसऱ्यांदा स्मरणपत्र पाठविले. (Encroachment reminder to Town Planning Department regarding black spots Nashik News)

मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर महामार्गावर (औरंगाबाद) बस दुर्घटना घडून बारा प्रवाशांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

महापालिका प्रशासनाने या भागातील परिस्थिती समजून घेत तातडीने हॉटेल मिरची चौकातील अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर शहरातील अपघाताचे ब्लॅक स्पॉट शोधले. शहरातील 27 ब्लॅक स्पॉट शोधून राज्य शासनाच्या रेसीलिएंट इंडिया कंपनीमार्फत उपाययोजना सुचविल्या.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Accidental Black Spot
NEET Exam : नीट अर्जाची वाढीव मुदत उद्यापर्यंत; विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी NTAचा निर्णय

या ठिकाणी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर रोड फर्निचरची आवश्यकता असल्याचेदेखील नमूद करण्यात आले. अतिक्रमण हटविण्यासाठी नगर रचना विभागाच्या माध्यमातून रेखांकन करणे गरजेचे असते.

परंतु नगररचना विभागाने या ठिकाणी रेखांकन न केल्याने अद्यापही अतिक्रमण काढता येत नसल्याचा दावा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांनी केला.

Accidental Black Spot
Dhule News : 3 महिन्यात जिल्ह्यातील 244 बेपत्ता; विविध पोलिस ठाण्यात नोंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()