Nashik News : थकबाकी वसुलीसाठी डिसेंबर अखेरचा अल्टीमेटम; पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीसाठी विशेष मोहीम

 Impact of Corona on Recovery Water bill House bill arrears
Impact of Corona on Recovery Water bill House bill arrears
Updated on

Nashik News : पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महापालिकेला शंभर टक्के मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली करणे बंधनकारक असल्याने त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी घरपट्टी व पाणीपट्टीच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबविताना थकबाकीदारांकडून डिसेंबर अखेरपर्यंत शंभर टक्के वसुलीच्या सूचना दिल्या आहेत.

पंधरावा वित्त आयोगाचा निधी हवा असेल तर त्यासाठी महापालिकेने नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याबरोबरच घरपट्टी व पाणीपट्टीची वसली शंभर टक्के करावी अशा सूचना आहेत.

नाशिक महापालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये घरपट्टीसाठी २०० कोटी रुपये, पाणीपट्टीसाठी ६५ कोटी रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. (End of December ultimatum for recovery of dues by nmc nashik news)

मात्र पंधरा वित्त आयोगाच्या निधीसाठी उत्पन्न उद्दिष्टात वाढ करण्याची अट समाविष्ट झाल्यानंतर दहा कोटींनी वाढ करून घरपट्टीचे नवीन उद्दिष्ट २१५ कोटी रुपये निश्चित करण्यात आले. तर पाणीपट्टीचे ७५ कोटींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. घरपट्टीची आगाऊ रक्कम अदा केल्यास त्यासाठी महापालिकेने सवलत योजना लागू केली होती.

आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात आगाऊ कर भरल्यास ८ टक्के, मे मध्ये ६ टक्के तर जून मध्ये चार टक्के सवलत योजना होती. या माध्यमातून नाशिक महापालिकेला घरपट्टीतून ९१ कोटी रुपये प्राप्त झाले. त्यानंतर विविध कर विभागाने थकबाकी वसुलीकडे मोर्चा वळविला. पाणीपट्टी वसुलीसाठी देखील विशेष मोहीम राबविण्यात आली.

यात अनधिकृत नळजोडण्या अधिकृत करण्याबरोबरच पाणी देयकांचे वाटप करण्याच्या सूचना दिल्या. पाणीपट्टीच्या माध्यमातून अवघे १९ कोटी रुपये वसूल झाले. वसुली वाढविण्यासाठी विविध कर विभागाने देयके वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले.

 Impact of Corona on Recovery Water bill House bill arrears
Nashik ZP News : कार्यकारी अभियंत्याविरोधात सीईओंकडे आमदारांच्या तक्रारी

दोन लाख पाच हजार नळजोडणी धारकांपैकी आत्तापर्यंत एक लाख ६९ हजार ५०० नळजोडणी धारकांना देयकांचे वाटप करण्यात आले. घरपट्टी व पाणीपट्टी शंभर टक्के वसूल करण्यासाठी डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

निवडणुकांमुळे उद्दिष्टाचा कालावधी कमी

पुढील वर्षाच्या एप्रिल व मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील असा अंदाज आहे. निवडणुकीसाठी महापालिकेच्या विविध कर विभागाचे कर्मचारी कार्यरत असतात. जानेवारी ते मार्च या कालावधीत वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न होतात. मात्र निवडणुकीच्या कामांमध्ये कर्मचारी व्यस्त झाल्यास महसूल वसुलीचे उद्दिष्ट गाठता येणार नाही. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंतच थकबाकी वसुली करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिल्या आहेत.

थकबाकी वसुलीचे आव्हान

थकबाकी वसुलीसाठी डिसेंबर अखेरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला असला तरी थकबाकीचा आकडा लक्षात घेता विविध कर विभागासमोर मोठे आव्हान आहे. घरपट्टीची थकबाकी ४६२ कोटी रुपये तर पाणीपट्टीची थकबाकी १४३ कोटी रुपये अशी एकूण ६०५ कोटी इतकी आहे.

 Impact of Corona on Recovery Water bill House bill arrears
Girl Birth Rate Increase : कोरोनानंतर मुलींच्या जन्मदरात वाढ; लिंगाची विचारणा करण्यांविरुद्ध गुन्हे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.