मालेगाव : शहर हे यंत्रमागाचे हब म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शहरात २४ तास यंत्रमाग सुरु राहतात. येथे रात्रीच्या वेळी अंडाभुर्जी व खानावळी चालतात. त्या हातगाड्यांवर यंत्रमाग मजूर रात्रीच्या वेळी जेवण करतात.
येथे हातगाड्यांवर रात्रीच्या वेळेस कारवाई करु नये अशी मागणी कॉंग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज बेग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली. या संदर्भात अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांची भेट घेत निवेदन सादर केले. (Enforcement action on handcarts should be stopped after 11 pm in city Statement to the Additional Superintendent of Police Nashik News)
येथे नुकत्याच रुजू झालेल्या सहाय्यक पोलिस उपअधिक्षक सविता गर्जे यांनी काही दिवसापुर्वी रात्रीच्या वेळेस हातगाडी चालकांना मारहाण केली. तसेच रात्री अकरानंतर येथील दुकाने बंद करावीत अशा सूचना दिल्या.
येथे यंत्रमाग कामगार हे रात्रभर यंत्रमाग चालवितात. त्यामुळे रात्री त्यांना भूक लागल्याने अंडाभुर्जी व इतर हातगाड्यांवर ते जेवण करण्यासाठी जावे लागते. शहरात हिंदू-मुस्लीम बांधवांचे सण एकत्रित येत आहेत.
सणानिमित्त कामगार हे जादा तास काम करीत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस दुकान बंद करण्यास सक्ती करु नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर श्री. बेग, जमील क्रांती, शकील मन्सुरी, जैनुलाब्दीन पठाण, हाशीम अन्सारी, शेख मन्नान, अब्दुल कय्युम, शेख मुख्तार, मोहम्मद साबीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.