विद्यार्थ्यी शोधण्यासाठी इंजिनिअरिंग प्राध्यापकांची आदिवासी भागात धडपड

engineering
engineeringGoogle
Updated on

मूलवड (जि. नाशिक) : महाराष्ट्रातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालय दरवर्षी विद्यार्थ्यांअभावी बंद पडत आहेत. अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा पदवी मिळविल्यानंतर अपेक्षेप्रमाणे नोकरी व वेतन मिळत नाही. हा अनुभव जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांना आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे बऱ्याच संस्था अभियांत्रिकी महाविद्यालय वाचवण्यासाठी धडपडत करत आहेत.

अशाच प्रकारे नाशिक, पुणे, ठाणे जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कर्मचारी दरवर्षी त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागात जिवाचा आटापिटा करत विद्यार्थी शोधताना दिसत आहेत. कारण विद्यार्थी मिळाले तरच आपली नोकरी शाबूत राहील, हे ओळखून जिवाचे रान करीत आहे. हे कर्मचारी, ठाणापाडा, मूलवड, बेरवळ, ओझरखेड या भागात खेडोपाडी जाऊन व संस्थेची माहिती व वैशिष्ट्यपूर्ण असणारी आकर्षक रंगीबेरंगी पत्रके नागरिकांना दाखवून महाविद्यालयांविषयी माहिती माहिती देताना दिसतात.

engineering
नाशिकमध्ये 'डेल्टा'च्या वाढत्या धोक्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट

आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण व राहण्याची मोफत सोय, तसेच कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक शुल्क न भरता थेट प्रवेश, आणखी वेगवेगळ्या प्रकारची आमिष, प्रलोभने दाखवून विद्यार्थी शोधण्याची तारेवरची कसरत हे कर्मचारी करत आहेत. बऱ्याच महाविद्यालयांनी नजीकच्या आश्रमशाळा, विद्यालयातील शिक्षकांना हाताशी धरून दांडग्या कमिशनवर विद्यार्थी शोधण्याची जबाबदारी सोपवली आहे. काही महाविद्यालयांनी बऱ्याच गावात कमिशन वर एजंट सुद्धा नेमले आहेत. हे एजंट सतत दहावी किंवा बारावी पास झालेल्या विद्यार्थी पालकांच्या संपर्कात असतात. अशा कसरतीतून अभियांत्रिकी महाविद्यालयाला आदिवासी भागात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळताना दिसतो.

engineering
नाशिकमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच डेंगीचे शेकडो रुग्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.