नाशिक : पोलिस ठाणेनिहाय असणाऱ्या शांतता समितीमध्ये नवतरुणांना स्थान मिळावे, त्यांना आपल्या हक्कांची आणि जबाबदारीची जाणीव व्हावी. या उद्देशाने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेनुसार शांतता समितीच्या सदस्यत्वासाठी ऑनलाइन नावनोंदणीला प्रारंभ झाला आहे.
यासाठी १८ ते २५ वयोगटातील तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन शहर पोलिस आयुक्तालयाच्यावतीने करण्यात आले आहे. (Enrollment for membership of Peace Committee begin appeal to youth by Nashik Police Commissionerate nashik news)
शांतता समितीमध्ये तरुणांचा सहभाग असावा, अशी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची संकल्पना आहे. या संकल्पनेनुसार, शांतता समितीत तरुणांचा सहभाव वाढावा, त्यांना शहरात राबविल्या जाणाऱ्या विविध सण-उत्सव, धार्मिक, सामाजिक, सार्वजनिक कार्यक्रमावेळी शांतता समितीच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जाते,
त्या प्रक्रियेत या तरुणांचा सहभाग असावा, यातून या तरुणांना त्यांच्या हक्कांची आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होऊ शकेल, या तरुणांसाठी आयुक्तालयाच्या माध्यमातून राज्यघटनेसह विविध सामाजिक-धार्मिक प्रवाहांबाबत कार्यशाळा घेऊन त्यांना त्याचे ज्ञान मिळेल अशी ही संकल्पना आहे.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
याच आधारे, पोलिस आयुक्तालयातर्फे शांतता समितीच्या सदस्यत्वाच्या नाव नोंदणीस प्रारंभ झाला आहे. यासाठी १८ ते २५ वयोगटातील तरुणांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. यासाठी https://forms.gle/TYaHsQ1qWg4qLpPSA या लिंकवर १५ मार्चपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. तसेच, शहर पोलिसांच्या संकेतस्थळ, अधिकृत ट्विटर हँडल व फेसबुक पेजवरही नावनोंदणीची लिंक उपलब्ध असल्याने तेथूनही नावनोंदणी करता येणार आहे.
योगदानाची संधी
पोलिस ठाणेनिहाय शांतता समिती असतात. या समितीमध्ये त्या-त्या परिसरातील सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असतो. त्याचवेळी आता पोलिस आयुक्तांच्या संकल्पनेनुसार १८ ते २५ वयोगटातील तरुणांना संधी मिळणार आहे.
या माध्यमातून तरुणांना प्रशासनाच्या कामकाजाची माहिती होऊ शकेल. तशीच, त्यांना सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान देण्याचीही संधी मिळणार आहे.
"शांतता समितीतील ज्येष्ठ सदस्य आणि प्रशासन यांचे मार्गदर्शन या तरुणांना असेल. त्यांना आपले व्यक्तिमत्त्व अधिक प्रगल्भ करण्याची संधीही या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन करतो."
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, नाशिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.