सिडकोत 112 मंडळांकडून गणेशाची उत्साहात प्रतिष्ठापना

A musical lighting spectacle performed by Raje Sambhaji Mitra Mandal at Pawan Nagar
A musical lighting spectacle performed by Raje Sambhaji Mitra Mandal at Pawan Nagaresakal
Updated on

सिडको (जि. नाशिक) : गणेशोत्सवासाठी सिडकोमध्ये उत्साहाचे वातावरण असून, अंबड पोलिस ठाण्यात लहान मोठ्या ११२ मंडळांनी अधिकृत नोंदणी केली आहे. यात सहा मोठ्या मंडळांचा आणि दोन मौल्यवान मंडळांचा समावेश आहे. बुधवारी (ता. ३१) पाच वाजता अर्धा तास आलेल्या मुसळधार पावसानेदेखील गणेश भक्तांचा उत्साह थोडादेखील कमी झाला नाही. (Enthusiastic installation of Ganesha by 112 mandals in Cidco Nashik Latest Marathi News)

मंगळवारी शिवाजी चौक, पवननगर, अंबड लिंक रोड, डीजीपीनगर, त्रिमूर्ती चौक आदी भागात घराघरांत विराजमान होणाऱ्या गणेशाच्या स्वागतासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले होते. पवननगर येथे तर शहरातील मेनरोड सारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

येथील स्टेडिअममध्ये गणेश विक्री केंद्रावर गणेशमूर्ती खरेदीसाठी गर्दी झाली होती. दिवसभरात शिवाजी चौक येथील माजी नगरसेवक बंटी तिदमे यांचे राजे छत्रपती मंडळ, मनसेचे अक्षय खांडरे यांचे श्रीमंत सिडकोचा महाराजा, माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचे पवननगर येथील राजे संभाजी सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, पाटीलनगर दत्तधाम चौक सांस्कृतिक कला मंडळ, शुभम पार्क येथील माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांचे शिवराज युवकमंडळ, माऊली लॉन्स येथील माऊली मित्रमंडळ या मोठ्या मंडळांनी उत्साहात गणेशाची स्थापना केली.

A musical lighting spectacle performed by Raje Sambhaji Mitra Mandal at Pawan Nagar
Jalgaon Ganeshotsav 2022 : गणपती मिरवणुक; पाहा PHOTOS

राजरत्न नगर येथील एकता विविध विकास संस्था आणि अंबड येथील श्रीकृष्ण कला क्रीडा मंडळाने मौल्यवान गणपती म्हणून अधिकृत नोंदणी केली आहे. तिदमे यांच्या मंडळातर्फे दररोज विविध स्पर्धा खेळा आणि जिंका या धर्तीवर बक्षिसांच्या विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. तर शिवराज मंडळातर्फे नरसिंह अवताराचा पौराणिक देखावा साकारण्यात येणार आहे.

शहाणे यांच्या राजे संभाजी मंडळाने म्युझिक लाइटिंगचा देखावा सादर केला असून, सायंकाळपासून येथे बघण्यासाठी मोठी गर्दी झाली. दोन दिवसात नागरिकांसाठी तो खुला करण्यात येईल. सिडकोचा श्रीमंत महाराजाला मिरवणुकीद्वारे मंडपात नेण्यात आले. सिडकोमधील सर्वच चौकात लहान मोठ्या मंडळांचा उत्साह ओसंडून वाहत होता. बहुतांश मंडळांनी विसर्जनासाठी परवानगी मागितलेली नाही.

A musical lighting spectacle performed by Raje Sambhaji Mitra Mandal at Pawan Nagar
Bribe Crime : कळवण प्रकल्पातील 2 कनिष्ठ लिपिक निलंबित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.