YIN Art Festival : युवा कलावंतांच्‍या कलाविष्कारांनी केले थक्‍क! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्‍स्‍फूर्त सहभाग

YIN Art Festival : युवा कलावंतांच्‍या कलाविष्कारांनी केले थक्‍क! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्‍स्‍फूर्त सहभाग
Updated on

YIN Art Festival : संगीताच्या तालावर थिरकतांना एकल नृत्‍याच्‍या सादरीकरणाने सभागृहात निर्माण झालेली ऊर्जा... सुरेल गायनाने वातावरणात संचारलेली प्रसन्नता... सुबक रांगोळी, नक्षीदार मेंदी, पथनाट्यातून छेडलेल्या सामाजिक विषयांपासून मूकाभिनयातून बोलक्‍या चेहऱ्यांनी वेधलेले लक्ष... वक्तृत्व स्‍पर्धेतील व्यक्‍तिमत्त्वाची झळाळी अन्‌ वादविवाद स्‍पर्धेत विषयांची मुद्देसूद मांडणी... अशा युवा कलावंतांच्‍या थक्‍क करणाऱ्या कलाविष्कारांची मेजवानी शुक्रवारी (ता. २०) कला रसिक, प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. (Enthusiastic participation of college students in yin art festival nashik news)

औचित्‍य होते, ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) तर्फे झालेल्या ‘यिन कला महोत्सव’ उपक्रमाचे. या दोनदिवसीय स्‍पर्धेतील पहिल्‍या दिवशी शुक्रवारी विविध कला प्रकारांच्‍या स्‍पर्धांना महाविद्यालयीन युवकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृह, मविप्र संस्‍थेचे आयएमआरटी महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय प्रांगण व सभागृह अशा विविध ठिकाणी एकाच वेळी वेगवेगळ्या कलाप्रकारांच्‍या स्‍पर्धा झाल्या.

स्‍पर्धेत सहभागाविषयी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उत्‍साहाचे वातावरण होते. त्‍यासाठी रंगीत तालीम करताना विद्यार्थी कसून सराव करत होते. त्‍यांनी घेतलेली मेहनत सादरीकरणात झळकत होती.

YIN Art Festival : युवा कलावंतांच्‍या कलाविष्कारांनी केले थक्‍क! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्‍स्‍फूर्त सहभाग
Maratha Reservation : डॉ. भारती पवारांच्या कार्यक्रमात मराठा आरक्षणप्रश्नी घोषणाबाजी; तरूणांना काढले बाहेर

प्रत्‍येक स्‍पर्धक विद्यार्थ्याने आपल्‍यातील कुशलतेचे दर्शन घडविल्‍याने परीक्षकांना विजेत्‍यांची निवड करण्यात कस लागला, तर कलाविष्कारांचे दर्शन घेण्यासाठी प्रत्‍येक विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. विशेषतः नृत्‍य आणि गायन स्‍पर्धेतील सादरीकरण पाहण्यासाठी थोरात सभागृहात गर्दी झाली होती.

मंत्री भुजबळ, आमदार तांबेंसह पाटील यांच्‍या उपस्‍थितीत आज पारितोषिक वितरण

‘यिन’ कला महोत्‍सवात शनिवारी (ता. २१) समूहनृत्‍य स्‍पर्धेसोबतच फॅशन शोचा जलवा बघायला मिळाला. तसेच दुपारी साडेचारला स्‍पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. समारंभास राज्‍याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, आमदार सत्‍यजित तांबे यांच्‍यासह युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष व युवानेते अमोल पाटील यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत विजेत्‍यांचा सन्‍मान केला जाणार आहे. सर्वच स्‍पर्धकांनी दमदार सहभाग नोंदविला असल्‍याने बक्षीस कुणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

YIN Art Festival : युवा कलावंतांच्‍या कलाविष्कारांनी केले थक्‍क! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्‍स्‍फूर्त सहभाग
Nashik News : 24 ऑक्टोबरला फांदीचे रोपण; बोधीवृक्ष महोत्सवाच्या काटेकोर नियोजनाच्या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.