Teacher Farewell: गुरुजींना निरोप देताना सारा गाव भावुक! 14 वर्षात घडविली शैक्षणिक क्रांती

Villagers and teachers bidding farewell to Satish Ingle and Rajesh Bhoye sir
Villagers and teachers bidding farewell to Satish Ingle and Rajesh Bhoye siresakal
Updated on

Teacher Farewell : जिल्हा परिषद आदर्श शाळा उंबरठाण येथील शिक्षक सतीश इंगळे व राजेश भोये यांना ग्रामस्थ, पालक, सहकारी शिक्षक व विद्यार्थिनी बदलीनिमित्त निरोप दिला.

चौदा वर्षे गावात राहिलेले आणि गावात आमूलाग्र शैक्षणिक बदल घडवून आणलेल्या या गुरुजींना निरोप देताना सारा गाव भावुक झाल्याचे पहावयास मिळाले. (entire village emotional while saying goodbye to teacher ingle and bhoye Educational revolution made in 14 years nashik)

जिल्हा परिषदने या शाळेला चौदा वर्षांपूर्वी दिलेले सतीश इंगळे हे पहिले शिक्षक होते. वस्तीशाळेपासून ते आदर्श शाळेपर्यत येथील शाळेचा प्रवास याच चौदा वर्षातील आहे.

गेली चौदा वर्षे त्यांनी विद्यार्थी सर्वांगिण विकास व गुणवत्ता, मिशन नवोदय, मिशन स्कॉलर, मिशन एकलव्य रेसिडेन्सी स्कूल, कोविड काळात ओट्यावरची शाळा, क्रीडास्पर्धा व वकृत्व स्पर्धेतील तालुका, जिल्हा पातळीवरील विद्यार्थ्यांचे यश, शाळेच्या भौतिक सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रम, सहल असे विविध उपक्रम राबवून प्रत्येक पालक व ग्रामस्थांच्या मनात घर केले होते.

श्री. इंगळे यांचे अकरा विद्यार्थी नवोदयसाठी पात्र झाले. २६ विद्यार्थी महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती पात्र झाले. ३४ विद्यार्थ्यांना मॉडेल एकलव्य रेसिडेन्सी स्कूलला प्रवेश मिळाला. कोविड काळातील ओट्यावरची शाळा या उपक्रमाला जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळाला.

अनेकांना आयुष्यभर नोकरी करून सेवापूर्तीच्या शेवटच्या दिवशीसुद्धा असे प्रेम मिळत नाही, ते श्री. इंगळे यांना चौदा वर्षात त्यांच्या वयाच्या ऐन पस्तीशीत मिळविले. मूळचे बीडचे असलेले इंगळे या आदिवासी भागात आल्यानंतर समरस होऊन गेले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Villagers and teachers bidding farewell to Satish Ingle and Rajesh Bhoye sir
Nashik DPC News: पुनर्विनियोजनातील जनसुविधेच्या साडेसहा कोटींची कामे रद्द?

उंबरठाणचे विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ हेच आपले कुटुंब मानून गावासाठी खूप काही केले. अनेक उपक्रम राबवून त्यांनी गावातील लोकांची मने जिंकली.

त्यांच्या प्रेमापोटी, आपल्याच कुटुंबातील एक व्यक्ती आपल्यातून सोडून चालली आहे म्हणून, जशी एखादी मुलगी लग्न होऊन सासरी जाते, तसा सन्मानपूर्वक निरोप उंबरठाणच्या ग्रामस्थांनी इंगळे व भोये यांना दिला.

ग्रामपंचायत सदस्य माधव पवार, पेसा कमिटी अध्यक्ष सुरेश चौधरी, यशवंत जाधव, प्राचार्य सीताराम पवार, मधुकर खोटरे, शिक्षणप्रेमी लक्ष्मण खोटरे, किसन पवार, माधव गायकवाड, हिरामण पवार, पांडुरंग पवार, सीताराम पवार, गोपाळ पवार, मधुकर देशमुख, रमण जाधव, जयवंत भोये, कैलास धूम हे उपस्थित होते.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मनीषा देशमुख, मुख्याध्यापक लक्ष्मण बागूल, शिक्षक जयराम धूम, राजेंद्र गावित, मंजुळा गावित, सुमित्रा जाधव, संगीता भोये, राहुल सावळे, योगिता महाले यांनी नियोजन केले.

Villagers and teachers bidding farewell to Satish Ingle and Rajesh Bhoye sir
Nashik News: ब्रह्मगिरीच्या पायऱ्यांवर पर्यावरण प्रेमींकडून ‘रोपांचा वे’! प्रस्तावित रोप वेला विरोध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.