Sant Nivruttinath Palakhi : दातली (ता. सिन्नर) येथील पहिल्या गोल रिंगण सोहळ्याने उपस्थित वारकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्यानंतर संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्याने आता नगर जिल्ह्यात प्रवेश केला आहे.
जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्यासह गावकऱ्यांनी दिंडी सोहळ्याचे स्वागत केले. (Entrance to palkhi ceremony of Nivruttinath in presence of Collector Salimath nashik news)
दिंडी सोहळ्यात आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी वारकऱ्यांची अतिशय चोखपणे या ठिकाणी व्यवस्था ठेवल्याने नगरवासियांचं ऋण आम्ही कायम स्मरणात ठेवू, असे प्रतिपादन पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.नारायण मुठाळ यांनी केले. यावेळी नगरचे जिल्हाधिकारी सालीमठ उपस्थित होते.
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे पाटील तसेच सचिव सोमनाथ घोटेकर, विश्वस्त अमर ठोंबरे, पुंडलिकराव थेटे आदी उपस्थित होते. मुठाळ यांनी यावेळी उपस्थित सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
नगर जिल्ह्यात पालखीचा हा पहिलाच मुक्काम पारेगाव येथे होता. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी सालीमठ यांनीही विश्वस्तांसोबत व पालखी प्रमुखांसोबत चर्चा केली. वारकऱ्यांसाठी ज्या मूलभूत सुविधा आहेत, त्या नगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
नगर जिल्ह्यामध्ये संत निवृत्तिनाथांचा समाधी सोहळा दरवर्षी आषाढीवारी मार्गावरच होत असतो. या सोहळ्यानिमित्ताने देखील जिल्हाधिकारी आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे संस्थांचे प्रसिद्धीप्रमुख तथा विश्वस्त अमर ठोंबरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.