Nashik Trimbakeshwar News : तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वरला जाताय? या वाहनांना 3 दिवस प्रवेशबंदी

Trimbakeshwar Temple
Trimbakeshwar Templeesakal
Updated on

Nashik Trimbakeshwar News : श्रावणमासातील तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे भाविक लाखोंच्या संख्येने ब्रह्मगिरी प्रदक्षिणा फेरीसाठी येतात. यामुळे त्र्यंबकरोडसह त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांच्या वाहनांची गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‌भवण्याची शक्यता आहे.

त्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या दृष्टिकोनातून २ ते ४ सप्टेंबर या दरम्यान त्र्यंबकेश्वरमध्ये कोणत्याही खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Entry of private vehicles banned in Trimbakeshwar for 3 days nashik news)

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची गर्दी होत असते. लाखो भाविक या महिन्यात दर्शनासाठी येतात. मात्र, तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असतात. ४ सप्टेंबर रोजी तिसरा श्रावण सोमवार आहे.

त्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता असल्याने दरवर्षीप्रमाणे त्र्यंबकरोडवरील खंबाळे, पहिने आणि आंबोली याठिकाणी खासगी वाहनांसाठी वाहनतळ असते. रस्त्यावर मोठ्यासंख्येने भाविक असतात. यातून अनुचित प्रकार घडू शकतो.

त्यामुळे २ ते ४ सप्टेंबर या दरम्यान त्र्यंबकेश्वरमध्ये काळ्या-पिवळ्या टॅक्सी, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहनांसह सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Trimbakeshwar Temple
Nashik Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये भाविकांना पहाटे 5 पासून दर्शन

मुंबई मोटार वाहन कायदा १९८८च्या ११५ अन्वये अपर जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी अधिसूचना जारी केली आहे. या आदेशानुसार नाशिक ग्रामीण पोलिसांकडून कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले जाणार आहे.

असे असतील वाहनतळ

नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खंबाळे येथे वाहनतळ.

जव्हारकडून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी आंबोली येथे वाहनतळ

घोटीमार्गे त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पहिने येथे वाहनतळ.

Trimbakeshwar Temple
Nashik Trimbakeshwar Temple : श्रावणी सोमवारनिमित्त हे आहे सिटीलिंक बसचे नियोजन...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.