सिडकोच्या उड्डाणपुलात पर्यावरणमंत्र्यांचा दणका

पुलाची नवीन संरचना करण्याच्या महापालिका आयुक्तांना सूचना
सिडकोच्या उड्डाणपुलात पर्यावरणमंत्र्यांचा दणका
Updated on

नाशिक : एक ना अनेक अडथळे पार करत शेवटच्या टप्प्यात न्यायालयीन प्रक्रियेत सापडलेल्या सिडकोच्या त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलाचे काम करताना नव्याने संरचना करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्याने महापालिकेला मोठा दणका मानला जात आहे. पुरातन वृक्षांच्या तोडीमुळे पर्यावरण प्रेमींनी केलेल्या आंदोलनाला यश आले असून, पर्यावरण मंत्र्यांच्या सूचनेवरून सोमवारी (ता. २४) सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला आहे.

सिडकोच्या उड्डाणपुलात पर्यावरणमंत्र्यांचा दणका
नेवासे : भेंड्यात पोलिस पथकावर हल्ला!

मायको सर्कल व त्रिमूर्ती चौकात उड्डाणपूल बांधला जात आहे. सुमारे अडीचशे कोटींच्या या पुलावरून अनेक वाद-विवाद झाले आहेत. नागरिकांचा विरोध, वाहतूक सर्वेक्षण न करताच उड्डाणपूल तयार केला जात असल्याने पहिल्या वादाला सुरवात झाली. मायको सर्कल येथे उड्डाणपूल आवश्‍यक होता. मात्र, त्रिमूर्ती चौकात उड्डाणपुलाची आवश्‍यकता नसतानही मंजूर केल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले होते. स्थानिक व्यावसायिकांनी रोष व्यक्त करत आंदोलनाची भूमिका घेतली होती. बरीच भवती अन्‌ भवती झाल्यानंतर श्रेयवाद सुरू झाला. भाजपच्या नेत्यांनी पुलाचे श्रेय घेतले. त्यानंतर सिमेंटच्या प्रतवारीवरून वाद झाला. तब्बल ४४ कोटी रुपये वाढविण्यात आल्याने अनेकांनी तोंडात बोटे घातली. उड्डाणपुलाच्या फेर बदलात स्टार रेटची अट टाकताना नव्याने मंजुरी दिल्याने पुलाच्या संरचनेचा प्रश्‍न निर्माण झाला. संरचना बदलली जात असेल, तर नव्याने निविदा का काढली गेली नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला. विशिष्ट ठेकेदार डोळ्यासमोर ठेवूनच प्रक्रिया राबविली जात असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी करत उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. भाजपचे सभागृहनेता कमलेश बोडके, गटनेता अरुण पवार, जगदीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनीही पुलाच्या निविदा प्रक्रियेवर संशय व्यक्त करीत प्रशासनाविरोधात दंड थोपटले. दरम्यान, त्रिमूर्ती चौकात उड्डाणपूल तयार करताना ५८८ वृक्षांची तोड होणार असल्याचा दावा करत वृक्षप्रेमी नागरिकांनी शनिवारी (ता. २२) उंटवाडी पुलाजवळील हेरिटेज वृक्षांखाली चिपको आंदोलन केले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी ट्विटरवरून संवाद साधताना, वृक्षांची तोड होऊ न देण्याचे आवाहन केले. दुपारी पर्यावरण मंत्र्यांनी दखल घेत ट्विटरवरून पुलाच्या संरचना बदलण्याच्या सूचना देताना झाडे वाचविण्याचे आवाहन केले.

सिडकोच्या उड्डाणपुलात पर्यावरणमंत्र्यांचा दणका
जळगाव : कोरोनाच्या नियमाचे उल्लघंन करणाऱ्या आर्यन रिसॉर्टला ५० हजारांचा दंड

काँग्रेसकडून वृक्षतोडीच्या नोटीस फाडून निषेध

सिडको : सिडकोतील उड्डाणपुलासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीबाबत सिडको ब्लॉक काँग्रेसने निषेध करून वृक्षतोडीच्या नोटीस फाडण्यात आल्या. सिडको ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील यांनी उंटवाडी येथील वटवृक्षाजवळ जाऊन महापालिकेने लावलेली नोटीस फाडत निषेध केला. सत्ता कुणाचीही असो, वृक्षतोडीला आम्ही विरोध करणारच, असे सांगत महापालिकेच्या कारभाराबाबत निषेध व्यक्त केला. प्रीतम भामरे, भरत पाटील, अमित खांडे, तेजस भामरे आदी या वेळी उपस्थित होते.

उद्यापासून सर्वेक्षण

पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी कुठल्याही परिस्थितीत दोनशे वर्षांपूर्वीची वृक्ष तोडू न देण्याच्या सुचना आयुक्त कैलास जाधव यांना केल्या. त्यानंतर आयुक्त जाधव यांनी स्पष्टीकरण देताना पुलाची नवीन संरचना करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी वास्तुविशारद, महापालिकेचे इंजिनिअर, सल्लागार कंपनी, तसेच पुलाचे काम करणारा ठेकेदार यांची बैठक घेऊन सर्वेक्षण करणार असल्याची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.