Nashik Crime: एर्टिगा कार, 3 दुचाक्या चोरट्यांनी केल्या लंपास

इमारतीच्या पार्किंगमधूनच वाहने चोरीला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.
Crime
Crimeesakal
Updated on

नाशिक : शहर परिसरातून एका महागड्या एर्टिगा कारसह तीन दुचाक्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.

वाहन चोरीच्या घटना सातत्या घडत आहेत. इमारतीच्या पार्किंगमधूनच वाहने चोरीला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. पोलीस गस्ती नावालाच राहिल्याचीही टीका होते आहे. (Ertiga car 3 two wheelers looted by thieves Nashik Crime)\

आडगाव शिवारातील श्रीराम नगरमधील बंगल्यासमोरून ३ लाखांची एर्टीगा कार चोरट्याने चोरून नेली.

उमेश माधवराव गवते (रा गुरुप्रसाद बंगला, श्रीरामनगर, आडगाव) यांची एर्टिगा कार (एमएच १५ इएक्स ७४१७) गेल्या शुक्रवारी (ता.२२) मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिजवान खान (रा. दख्खनीपूरा, भद्रकाली) यांची २५ हजारांची ॲक्टिवा मोपेड (एमएच १५ जीजे ८६३५) गेल्या १० तारखेला दुपारी २ वाजता वावरे लेन येथून चोरीला गेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime
Nashik Crime: 'कुसुम’च्या बनावट संकेतस्थळाद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक; आकर्षक अनुदानाचे दाखविले जाते आमिष

सुरज बैजनाथ सहाणे (रा. भगतसिंग चौक, स्वारबाबानगर, सातपूर) यांची १० हजारांची पॅशन प्लस दुचाकी (एमएच १५ बीटी १४८२) गेल्या १८ तारखेला मध्यरात्री जिल्हा रुग्णालयाच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल छोटेलाल लाहोरी (रा. वनिता निवास, जयभवानी रोड, नाशिकरोड) यांची ४५ हजारांची दुचाकी (एमएच १५ एचव्ही ७०५१) अज्ञात चोरट्याने गेल्या शनिवारी (ता.२३) चोरीला गेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Crime
Cyber Crime: ऑनलाईन शेअर मार्केट शिकवण्याचे सांगून ३४ वर्षीय महिलेला घालण्यात आला २४ लाखांना गंडा, वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.