निराधारांना आधार देत जागविल्या वडिलांच्या स्मृती

'समर्थ सावली' संगोपन केंद्र
'समर्थ सावली' संगोपन केंद्र esakal
Updated on

सिन्नर (नाशिक) : वडिलांच्या निधनानंतर रोज 300 रुपयांची बचत करीत निराधार मुलांसाठी हक्काचे समर्थ सावली संगोपन केंद्र स्थापन केले आहे. मातृपितृ छत्र हरपलेल्या तसेच निराधार मुलांसाठी या केंद्राची स्थापना ठाणगाव येथे सुरू करून जयराम शिंदे यांनी समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो हे कृतीतून दाखवून दिले आहे.

स्व. देवराम कारभारी शिंदे फाऊंडेशन संचलित समर्थ सावली बाल संगोपन केंद्र ठाणगाव येथे एक हक्काचे आश्रयस्थान अनाथ, निराधार मुलांसाठी स्थापन केले आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयातच मातृछत्र हरपले तर... असे बालपण मुलांसाठी जीवनाला एक नवीन कलाटणी देतात. त्यांचे पुढील शिक्षण, जीवन हे सुखकारक व्हावे तसेच त्यांचे बालपण एकत्र कुटुंब सारखेच जावे या चिमुकल्यांना आई-वडिलांची उणीव भासू नये या हेतूने हे केंद्र स्थापन केले आहे.

जयराम शिंदे यांनी २०१९ या वर्षी स्वर्गीय देवराम कारभारी शिंदे फाऊंडेशन संचलित समर्थ सावली बालसंगोपन केंद्राची स्थापना केली. या संस्थेत आज मातृ-पितृ छत्र हरपलेले चिमुकले मोफत प्रवेश आहे. वडिलांचे २००९ मध्ये निधन झाले. वडिलांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी तसेच समाजासाठी आपण काहीतरी प्रेरित होऊन केले पाहिजे या हेतूने रोज तीनशे रुपयांची बचत बाजूला सारत सुमारे १५ ते १६ लाख रुपये जमा केले. समर्थ सावली ही निराधार मुलांचे आधारवड ही अशी सुसज्ज इमारत ठाणगाव येथील त्यांच्या शेतात उभी केली. अनेक आव्हाने पार करीत शिंदे यांनी तालुक्यात अनाथ मुलांसाठी हक्काचे समर्थ सावली संगोपन केंद्र स्थापन केले आहे. या केंद्रामध्ये सुमारे चाळीस मुलांची क्षमता असल्याचे जयराम शिंदे यांनी सांगितले.

शून्य ते मोठ्या बालकांचीही देखभाल

शून्य ते मोठ्या बालकांचे संगोपन व्यवस्थितरीत्या होण्यासाठी अभ्यासिका, जेवण व्यवस्था, दर्जेदार शाळेची व्यवस्था, शालेय साहित्य, तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, संस्कार शिबिरे, मोफत गणवेश असे विविध उपक्रमशील अशा शिक्षण पद्धतीवर भर देत मोफत प्रवेश देण्याचा मानस जय राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

'समर्थ सावली' संगोपन केंद्र
Nashik : बंदीजनांसाठी २० मे पासून अभंग, भजन गायन स्पर्धा

"माझ्या वडिलांचे २००९ मध्ये निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही तरी चांगले काम करायचेया हेतूने अनाथ, निराधार मुलांचा आधार बनायचे ठरविले. बचतीद्वारे माझ्याकडे जवळपास पंधरा लाख रुपये जमले होते, त्यातून समर्थ सावलीची अद्यावत व सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. समर्थ सावली बालसंगोपन केंद्राच्या माध्यमातून अनाथ मुलांच्यासाठी काम करून वडिलांच्या आठवणी आयुष्यभर जपण्याचा छोटासा प्रयत्न या कार्यातून करणार आहे."

- जयराम शिंदे, संस्थापक अध्यक्ष, स्व. देवराम कारभारी शिंदे फाउंडेशन, ठाणगाव.

'समर्थ सावली' संगोपन केंद्र
सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेस 8 लाखांचा नफा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()