Nashik News: धोकादायक रुळावरून प्रवाशांचे स्थलांतर! रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

Passengers crossing the track to go from platform number one to two.
Passengers crossing the track to go from platform number one to two.esakal
Updated on

Nashik News : नाशिक रोड रेल्वेस्थानकावर सध्या प्रवासी आपल्या बॅगा प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून दोनवर हलविण्यासाठी थेट शॉर्टकट शोधत आहेत. प्रवासी धोकेदायक पद्धतीने मार्गक्रमण करीत आहे.

त्यामुळे याकडे रेल्वे प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत असून, या सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद होऊनही प्रवाशांवर कडक शासन केले जात नसल्याचा प्रकार नाशिक रोड रेल्वेस्थानकावर घडत आहे. (Evacuation of passengers from dangerous track Neglect of Railway Administration Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Passengers crossing the track to go from platform number one to two.
Nashik Prohibition Order: आयुक्तालय हद्दीत मनाई आदेश लागू

सध्या प्रवासी रेल्वेस्थानकावर प्रवेश केल्यानंतर बॅगा स्थलांतर करण्यासाठी शॉर्टकट मार्ग शोधत आहे. यासाठी थेट प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या खाली उतरून दोनवर ते बॅगा ठेवून चढत आहे. यादरम्यान दोन्ही रुळांवरून एखादी ट्रेन वेगाने येऊ शकते व मोठा अनर्थ घडू शकतो.

असे असतानाही याची जाणीव रेल्वे प्रशासनाला नसल्यामुळे थेट स्टेशनमास्तर व इतर अधिकाऱ्यांच्या समोर प्रवासी धोकादायक प्रवास करूनही येथील यंत्रणा सुस्त बसलेली आहे.

शिवाय रेल्वे पोलिस आरपीएफचे कर्मचारीही अशा प्रवाशांना कडक दंड व शासन करण्यासाठी धजावत नाही. वर्षाला नाममात्र केसेस रूळ ओलांडण्याच्या होतात. रोज किमान शंभर ते दीडशे प्रवासी अनधिकृतरीत्या रूळ ओलांडत असून, अशा प्रवाशांना दंड केला जात नाही.

Passengers crossing the track to go from platform number one to two.
Nashik News: रामतीर्थावर भिकाऱ्यांची वाढली गर्दी! भाविक, पर्यटकांना नाशिकचे वेगळे दर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.