Water Supply News : ‘निळवंडे’ चे आवर्तन सुटूनही सिन्नरकर कोरडेच

Water Supply News
Water Supply Newsesakal
Updated on

Nashik News : गत ५३ वर्ष सुरू असलेल्या लढा आणि संघर्षाला यश मिळून नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, राहता व कोपरगाव हे तालुके आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील सहा गावातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न गेल्या आठवड्यात मार्गी लागला आहे.

१९९३ पासून रखडलेल्या या कालव्याचे काम मार्गी लागले असले तरी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणाऱ्या सहा गावांमध्ये वितरिकांचे काम कागदावरच असल्यामुळे निळवंडेतून पाणी सुटूनही सिन्नरचा पूर्व भाग मात्र कोरडाच राहणार आहे. (Even after release of Nilwande Sinnarkar remains dry Distribution works in six villages are only on paper three thousand hectares area under irrigation Nashik News)

बहुप्रतीक्षीत असलेला अकोले तालुक्यातील ऊर्ध्व प्रवरा प्रकल्प अर्थात निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याची चाचणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. वितरिकांच्या कामासंदर्भात आराखडे बनवण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यानंतर अंदाजपत्रक आणि नंतर कार्यारंभ आदेश देऊन दिवाळीदरम्यान सिन्नरच्या लाभक्षेत्रातील वितरिकांची कामे सुरू होणार असल्याची माहिती अकोले जलसंपदा विभागाने दिली.

सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे आणि वारेगाव या सहा गावांचा निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात समावेश करण्यात आला आहे.

या सहा गावांचे मिळून दोन हजार ६१२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित आहे. नगरमधील अकोले, संगमनेर, राहता, श्रीरामपूर, कोपरगाव या पाच तालुक्यासोबतच नाशिकमधील सिन्नर अशा सहा तालुक्यांतील ११३ गावांचे मिळून ४३ हजार ८६५ हेक्टर क्षेत्र निळवंडेच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Water Supply News
Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

चिंचोली गुरव, देवकौठेपर्यंत आलेल्या मुख्य वितरीकेपासून उपचाऱ्या काढून त्याद्वारे सिन्नर तालुक्यातील सीमावर्ती सहा गावांमध्ये प्रवरेचे पाणी खेळविण्याचे नियोजन आहे. तालुक्यात सर्वात मोठा असलेला दुसंगवाडी येथील पाझर तलाव, मलढोण,सायाळे येथील बंधारे भरून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रत्यक्षात नगर जिल्ह्यातील लाभक्षेत्रात असणाऱ्या वितरिकांची कामे कासव गतीने पुढे सरकत असताना सिन्नरमध्ये मात्र कागदी घोडे नाचवण्यापलीकडे काहीही झालेले नाही.

सिन्नर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांमध्ये वितरिकांचे केवळ सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे नगरकरांच्या बरोबरीने निळवंडेच्या पाण्याची वाट बघणाऱ्या सिन्नरच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना पुढचे काही वर्ष तरी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

Water Supply News
Crime News: आधी दारू पाजली नंतर लाटण्याने हाणलं; बायकोने केली नवऱ्याची हत्या, धक्कादायक प्रकार उघड

बंदिस्त वितरिकांचा प्रस्ताव....

संगमनेर तालुक्यातील कमळेश्वर येथील बोगद्याजवळ धरणापासून ६६ किलोमीटर अंतरावर तळेगाव शाखा सुरू होते. पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी या शाखेच्या १४ किलोमीटर अंतरात चिंचोली गुरवपर्यंत व तेथून पुढे सिन्नर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांपर्यंत बंदिस्त वितरिकांचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने तयार केला आहे.

"निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रात सिन्नर तालुक्यातील दुष्काळी असणाऱ्या गावांचा समावेश आहे. टोकाला ही गावे वर्षानुवर्षे निळवंडेच्या पाण्याची वाट बघत आहेत. प्रकल्पाचा लाभ शेवटच्या टोकाकडे असणाऱ्या गावांना मिळणे आवश्यक आहे.

मग ती गावे सिन्नर मधील असोत की राहता, कोपरगाव तालुक्यातील. पाणी वितरणासाठी शेवटच्या टोकाकडील गावांमध्ये चाऱ्यांची कामे प्राधान्याने व्हावीत व यासाठी शासन स्तरावर मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे."

- माणिकराव कोकाटे आमदार, सिन्नर

"दुष्काळी असलेल्या सिन्नरच्या पूर्व भागात निळवंडे धरणाच्या चाऱ्यांचे काम तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे. मात्र, शासन स्तरावर याबाबत उदासीनता दिसून येते. सिन्नरच्या राजकीय नेतृत्वाने देखील तालुक्यातील सहा गावांतील शेतकऱ्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे."

- विजय शिंदे

Water Supply News
NMC News: बेकायदेशीर पदोन्नतीचे इतिवृत्त मंजुरीसाठी धावाधाव; प्रशासन उपायुक्त विरोधात CM शिंदेंकडे तक्रार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.