Nashik : रामकुंड नव्हे...रामतीर्थ!; ब्रह्महत्या पापमुक्तीसाठी ‘रामतीर्थ’चा दाखला

Godaghat
Godaghatesakal
Updated on

पद्मपुराणात उल्लेख : विष्णूंचे सुंदरनारायण अन् शंभू महादेवांचे श्री कपालेश्‍वर रूपात वास्तव्याने हरिहर क्षेत्र

नाशिक : प्रभू श्रीरामचंद्र यांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या नाशिकचा उल्लेख पद्मपुराणात ‘हरिहर क्षेत्र’ असा केला आहे. भगवान विष्णू यांचे सुंदरनारायण रूपात अन् शंभू महादेवांचे श्री कपालेश्‍वर रूपात वास्तव्य असल्याने ‘हरिहर क्षेत्र’ म्हटले गेले आहे. पद्मपुराणात ब्रह्महत्या पापमुक्तीच्या अनुषंगाने गोदावरीवरील ‘रामतीर्थ’चा दाखला देण्यात आला आहे. या संदर्भामुळे यापुढे ‘रामकुंड’ असा उल्लेख न करता सर्वांनीच आता ‘रामतीर्थ’ म्हणावे, यासाठी नाशिकप्रेमी आग्रही आहेत. (Evidence of Ram Teertha for absolving sins of Brahmin killing Nashik Latest Marathi News)

भगवान शंभू महादेवांना ब्रह्महत्येचे पाप लागले होते. पाच मुखांपैकी चार मुखांनी वेदांचे उच्चारण व्हायचे आणि पाचवे मुख भगवान विष्णू यांची निंदा करत होते, हे पाहून भगवान शंभू महादेव दुःखी झाले. शंभू महादेवांनी ब्रह्म देवाच्या पाचव्या मुखाचा छेद केला. ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी शंभू महादेव बारा वर्षे तीर्थपर्यटन करत होते.

त्या वेळी ते कश्‍यपी संगमावर (आता हे संगमस्थान गंगापूर धरणात बुडाले आहे) आले. एका ब्राह्मण कुटुंबाच्या घरापुढे ते उभे होते. त्या वेळी त्यांनी गाय आणि नंदीचे संभाषण ऐकले. मी उद्या मालकाला मारणार आहे, असे नंदी म्हणाला. तेव्हा गायीने ब्रह्महत्येचे पाप लागेल, असे सांगितले. त्या वेळी ब्रह्महत्या पाप नष्ट होण्याच्या स्थानाची मला माहिती आहे, असे नंदीने सांगितले.

नासिककेहं गमिष्यामि तत्र पापं हि गच्छति

अरुणावरुणयोर्मध्ये यंत्र प्राची सरस्वती

पद्मपुराणातील त्यासंबंधीचा हा श्‍लोक आहे. नंदीने ब्रह्महत्या केली आणि नाशिकमधील रामतीर्थातंर्गतच्या अरुणा संगमावर तो आला. शंभू महादेव त्याच्या पाठीमागे आले होते. अरुणा संगमात स्नान करून शुद्ध झालेल्या नंदीला पाहिल्यावर शंभू महादेवांनी स्नान केले. त्या वेळी ब्रह्महत्येचे कपाळ गळून पडले. तेव्हापासून शंभू महादेव यांनी या परिसरात कायम वास्तव्य केले. भगवान विष्णू यांनी श्री कपालेश्‍वर महादेवाची स्तुती केली.

Godaghat
Water Connection Inspection Campaign : शहरात अनधिकृत नळजोडणी तपासणी मोहीम

ती याप्रमाणे :

गोदाया: सन्निधौ पुण्यं नासिकं नासिकोपमम्।

यत्र माहेश्‍वरं लिंगं कपालेश्‍वरनामकम्। (स्कंद पुराण)

दृष्टवा द्वादशलिंगानि नरो यतफलमश्‍नुते।

तत्फलं शतधा प्रोक्तं श्रीकपालेश्‍वरदर्शनात् ।। (पद्मपुराण)

बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शनाचे फळ एका श्री कपालेश्‍वर महादेव दर्शनाने प्राप्त होते, असा उल्लेख आढळतो. नाशिकमधील रामतीर्थालगत असलेल्या श्री कपालेश्‍वर मंदिरात नंदीला गुरू स्वरुपात मानले गेल्याने शंभू महादेवांच्या पिंडीच्या पुढे नंदी नाही. त्यामुळेच देशातील हे एक अद्वितीय तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. (क्रमशः)

स्कंद पुराणातील गोदावरी जन्माचा श्‍लोक

कृते लक्षद्वयातीते मान्धातरि शके सति।

कूर्मे चैवावतारे च सिंहस्थे च बृहस्पती।।

माघे ममासे सिते पक्षे दशम्यां सौम्यवासरे।

माध्यान्हे तु समायाता गौतमी पुण्यपावनी ।। (स्कंद पुराण)

कुर्मावतारात कृत युगाचे दोन लाख वर्षे झाल्यावर मांधात राजाच्या शक संवत्सरमध्ये माघ शुल्क दशमीच्या बुधवार या दिवशी मध्यान्हाला (दुपारी) भगवान शंकर यांच्या जटेतून श्री गोदावरी पृथ्वीवर अवतरली. त्या वेळी बृहस्पती सिंह राशीमध्ये होते.

Godaghat
Nashik : धुळ्याचे अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव नाशिकचे शहर पोलिस उपायुक्त

"सत्ययुगातील प्रसंग आणि पद्मपुराणातील शंभू महादेव यांचे ब्रह्महत्येचे पाप नष्ट होणे, हे उल्लेख पाहता, नाशिकनगरी प्रभू श्रीरामचंद्र आणि शंभू महादेव यांच्या भक्तीसाठीची पुण्यभूमी आहे. रामतीर्थ आणि अरुणा-वरुणा संगमतीर्थ हे गोदावरीचे पावित्र्य आपल्याला शिकवतात. म्हणूनच रामतीर्थासाठी पुराव्याचा ऐतिहासिक, पौराणिक, नामावळी या परंपरांच्या अनुषंगाने विविध बाबी आपल्याकडे उपलब्ध आहेत. हे ‘रामतीर्थ’साठी मोलाचे आहे."

- शांतारामशास्त्री भानोसे (स्मार्त चूडामणि, नाशिक)

"गोदावरी नदीपात्रातील तीर्थांचा उल्लेख नाशिकच्या १८८३ च्या बाँबे प्रेसिडेन्सी गॅझेटिअरमध्ये आहे. गोवर्धन, पितृ, गालव, ब्रह्म, ऋणमोचन, कण्व अथवा क्षुधा, पापनाशन, विश्‍वमित्र, श्‍वेत, कोटी आणि अग्नी अशा तीर्थांचा त्यात समावेश असून, तीर्थांची स्थान निश्‍चिती होणे गरजेचे आहे. ब्रह्म तथा बद्रिका संगम तीर्थ आहे. शुक्ल आणि अस्थीविलय तीर्थ आहे. रामगया, अरुणा, सूर्य, चक्र, अश्‍विनी आणि दशाश्‍वमेघ तीर्थ आहेत. या तीर्थांचे महत्त्व गोदावरी नदी पात्रात सिमेंट काँक्रिट केल्याने नष्ट झाले आहे. काँक्रिटच्या पाशातून गोदावरीला मुक्त केल्यानंतर तीर्थ पुनरुज्जीवित होतील."

- देवांग जानी (अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती)

Godaghat
High Blood Pressure in women : उच्च रक्‍तदाब ठरतोय महिलांचा शत्रू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.