Nashik: माजी आमदारांची मोट विस्कळित! संजय पवारांनी सोडली भुजबळांची साथ; नांदगावची राजकीय समीकरणे बदलणार?

chhagan bhujbal
chhagan bhujbalesakal
Updated on

नांदगाव : मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे यांच्याकडे हिशेब मागण्याचा अधिकार नाही. श्री. जरांगे यांना भुजबळांनी केलेला विरोध हा आमच्या समस्त मराठा समाजाचा अवमान असल्याची तीव्र प्रतिक्रिया देत नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी गुरुवारी (ता.२६) छगन भुजबळ यांची साथ सोडली.

श्री. पवार यांनी भुजबळ यांची साथ सोडल्याने भुजबळांना मोठा धक्का समजला जात आहे. श्री. पवार यांच्या जाण्याने नांदगाव विधानसभा मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. (Ex MLA total deranged Sanjay Pawar left Bhujbal side Will political equations of Nandgaon change Nashik)

नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात आठ महिन्यापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी पाच माजी आमदारांना एकत्र आणून त्यांची मोट बांधली होती. माजी आमदारांची ही एकजूट दीर्घकाळ टिकेल असा अंदाज वर्तविण्यात येत होता.

मात्र अवघ्या आठच महिन्यात ही मोट विस्कळित झाली आहे. श्री. पवार यांनी छगन भुजबळ यांची साथ सोडल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

पाचही माजी आमदारांच्या मोठ मधून माजी आमदार राजाभाऊ देशमुख हे सर्व प्रथम बाहेर पडले होते. त्यानंतर आता संजय पवार बाहेर पडले आहे. माजी आमदार ॲड. अनिल आहेर यांची राहुटी स्वतंत्र आहे.

chhagan bhujbal
Nashik Political: शरद पवारांना मानणारा दिंडोरी तालुका : कोंडाजी आव्हाड

मंत्री भुजबळ यांच्या सोबत आता त्यांचे पुत्र तथा माजी आमदार पंकज भुजबळ हे एकमेव माजी आमदार उरले आहेत. माजी आमदार ॲड. जगन्नाथ धात्रक यांना मंत्री छगन भुजबळ यांच्या सोबत उघडपणे जात येत नाही.

विस्कळित झालेल्या या मोटीचा लाभ विद्यमान आमदार सुहास कांदे कशा पद्धतीने घेतात याकडे मतदार संघातील सर्वांचे लक्ष लागले आहे.

chhagan bhujbal
Jalgaon Political News: जळगाव लोकसभेच्या जागेवार राष्ट्रवादीचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.